एक्स्प्लोर

BEST bus ticket: मुंबईत बेस्ट बसच्या तिकीटाच्या दरात मोठी वाढ होणार? आदित्य ठाकरेंच्या ट्विटने चर्चांना उधाण

Mumbai News: मुंबईकर दैनंदिन प्रवासासाठी लोकल ट्रेन पाठोपाठ बेस्ट बसेसचा वापर करतात. बेस्ट बसची सुविधा ही भारतातील प्रभावी वाहतूक सुविधांपैकी एक आहे. मात्र, आता बेस्टच्या तिकीट दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यभरात सत्ताधारी महायुती आणि विरोधातील महाविकास आघाडी यांच्यात आरोप-प्रत्यारोपाचे युद्ध सुरु आहे. अशातच आता आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी भाजप पक्षावर टीकेची तोफ डागली आहे. येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील बेस्ट बसेसच्या तिकीटाच्या दरात वाढ होऊ शकते. राज्य सरकार बेस्टच्या तिकीटाचे (BEST bus fare) दर वाढवण्याच्या विचारात आहे, असे आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

आम्ही नेहमीच सांगत आलो आहोत की, भाजप हा मुंबईविरोधी पक्ष आहे. त्यामुळेच भाजपने बेस्ट बसच्या तिकीटदरात वाढ करुन मुंबईकरांचा खिसा कापायचे ठरवले आहे. अगोदरच बेस्ट बसेसची संख्या कमी करण्यात आली आहे. तसेच बस थांबण्याच्या थांब्यांचा वापर जाहिरातींचे फलक लावण्यासाठी केला जात आहे. कंत्राटदारांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. 

शाहू महाराजांविरोधात भाजप एका गद्दाराला उभा करतील असं वाटतं नव्हतं; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

बेस्ट बसच्या तिकीटाचे दर वाढवण्याची गरजच काय? आदित्य ठाकरेंचा सवाल

आमच्या काळात आम्ही बेस्ट बसेसच्या तिकीटाचे दर परवडणारे ठेवले होते. बेस्टच्या ताफ्यात 10 हजार इलेक्ट्रिक बसेस समाविष्ट करुनही जगात सर्वाधिक परवडणाऱ्या दरात आम्ही सेवा पुरवली. मात्र, भाजपच्या काळात तिकीटाचे हे दर वाढवले जात आहेत. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागणार आहे. राज्यात आमची सत्ता आल्यानंतर आम्ही हा निर्णय बदलू, असे आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. 

आदित्य ठाकरेंकडून राज्यभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार

राज्यात लोकसभा निवडणुकीचे वातावरण तापल्यापासून आदित्य ठाकरे हे प्रचाराच्या मैदानात उतरले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आदित्य ठाकरे हे राज्याच्या विविध भागांमध्ये फिरुन महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. आदित्य ठाकरे यांनी नुकतीच कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये शाहू महाराज आणि सत्यजित पाटील यांच्या प्रचारासाठी सभा घेतली होती.

आणखी वाचा

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदासाठी तुमचं ग्रुमिंग करणार होते; आदित्य ठाकरे म्हणाले...

रोहित धामणस्कर, एबीपी माझा ऑनलाईन टीममध्ये डेप्युटी प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत. अनुभवी आणि अभ्यासू पत्रकार म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी सेंट झेवियर्स या प्रतिष्ठित महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात त्यांचा तब्बल १२ वर्षांचा अनुभव आहे. आपल्या या कारकीर्दीत त्यांनी महाराष्ट्रातील अग्रगण्य वृत्तसंस्थांसोबत काम केले आहे. यामध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, झी २४ तास, टीव्ही ९ मराठी अशा नामांकित संस्थांचा समावेश आहे.

 सामाजिक, राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्यांच्या लिखाणाची आणि वार्तांकनाची त्यांना विशेष आवड आहे. पडद्यामागच्या राजकीय घडामोडी, राजकीय नेत्यांचे किस्से, शासनाच्या धोरणामागील किंवा निर्णयामागील मूळ कारणे आणि त्याचा थेट जनसामान्यांवर होणारा परिणाम यावर ते सखोल लेखन करतात. देश आणि राज्याच्या पातळीवर सातत्याने बदलत जाणारे राजकारण, बदलत जाणारी समीकरणे अचूकपणे मांडण्यात त्यांचे विशेष कौशल्य आहे. जनसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या प्रश्नांवर लिहिणे हा त्यांच्या पत्रकारितेचा गाभा राहिला आहे.

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
Satara Result 2026: सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने 9 जागा जिंकल्या, पण रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या भावाचा पराभव, अध्यक्षपदासाठी पुन्हा रस्सीखेच होणार

व्हिडीओ

Punjab Operation Lotus Bhagwant Mann : ऑपरेशन लोटस ऑन अडचणीत भगवंत मान? Special Report
NCP Internal Clash Parth Pawar : अंतर्गत वादावादी? प्रचंड 'शाह'वादी! Special Report
Dia Mirza vs BMC on Diwali Pollution : व्हिडीओवरून कुरबूर बीएमसीत 'मिर्झा'पूर Special Report
Sanjay Raut : अमित शहांची केंद्रीय गृहमंत्रिपदावरून तातडीने हकालपट्टी करा; संजय राऊतांची थेट मागणी
Coffee With Kaushik Sandeep Tamgadge : चीनची घुसखोरी ते म्यानमारमधील तस्करी, भिडणारा अधिकारी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Supreme Court: एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
एकाच ठिकाणी अनिश्चित काळासाठी आंदोलने करता येणार नाहीत, सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी
Gokul Election: गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
गोकुळ अध्यक्ष निवडी बाबतीत वाढलेल्या घडामोडीनंतर महायुतीमधील अंतर्गत नाराजी उफाळली
Satara District Bank Election Result 2026: राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
राज्यात महायुती, साताऱ्यात सत्तासंघर्ष कायम; 21 पैकी कोणत्या पक्षाला किती मिळाल्या जागा? DCC बँकेच्या अध्यक्षपदासाठी नवं राजकीय गणितं
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
पुणे महापालिकेत गिफ्टच्या बॉक्सची पिशवी घेऊन अज्ञात व्यक्तीचा शिरकाव, व्हिडिओ व्हायरल; आयुक्तांकडे कारवाईची मागणी
Sangola Crime News: सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सांगोल्यात भाजप पदाधिकाऱ्याची गोळ्या घालून हत्या, 7 दिवसांनंतरही कारवाई होईना; कुटुंबीयांचा संताप, शिवसेनेच्या नेत्यावर आरोप
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
सोलापूर जिल्हा बँक निवडणूक, अकलूजला धक्का; रणजिसिंह मोहिते पाटलांसह भाजपच्या प्रशांत परिचारकांचाही अर्ज बाद
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
शासन नियुक्त संचालकांना मतदानाचा अधिकार देत संख्याबळ फिरवणार असतील, तर मग निवडणुका घ्यायच्या कशाला? लोकांच्या मताचा काय अर्थ? गोकुळमध्ये मागच्या दारानं सत्ता काबीज करण्यावर सतेज पाटलांची थेट विचारणा
Thane Crime News: डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
डोंबिवलीत मित्रानेच मित्राला संंपवलं, 20 दिवस बॉडी लपवली, पण मेलेल्या मित्राने स्वप्नात येऊन हैराण केलं, अखेर पोलिसांकडे जाऊन कबुली दिली
Embed widget