KCR Remark over TRS MLAs Poaching case: तेलंगणाचे  (Telangana) मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekar Rao) यांनी भाजपवर (BJP) टीआरएस (TRS) आमदारांना खरेदी करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. मुख्यमंत्री केसीआरच्या म्हणण्यानुसार, भाजपने टीआरएसच्या 20-30 आमदारांना आमिष दाखवून खरेदी करण्याचा प्रयत्न केला. एका सभेत केसीआर म्हणाले की, टीआरएस आमदारांना 100 कोटी रुपये देऊ केले होते.


तेलंगणामधील मुनुगोडे विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या (Manugode Bypoll) सभेला संबोधित करताना केसीआर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Pm Modi) टीआरएस आमदारांची (TRS MLA) खरेदी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. केसीआर म्हणाले की, "मी नरेंद्र मोदींना विचारतो, ही क्रूरता का, तुम्हाला किती सत्ता हवी? तुम्ही याआधीही दोनदा निवडून आलात, मग सरकार का पाडताय? ज्यांनी मोदी आणि आरएसएससाठी काम केले, ज्यांनी आमच्या तेलंगणा सरकारविरुद्ध कट रचला ते मध्यवर्ती कारागृहात आहेत.


सभेत आमदारांना उपस्थित करताना केसीआर म्हणाले, "माझ्यासोबत चार आमदार हैदराबादहून मुनुगोडे येथे आले आहेत. हे माझे चार आमदार आहेत, ज्यांनी आमच्या सरकारच्या विरोधात कारस्थान करणाऱ्या दिल्लीच्या सत्तेकरांचे करोडो रुपये नाकारले.'' केसीआर म्हणाले, "दिल्लीतील काही नेत्यांनी तेलंगणाचा स्वाभिमान विकत घेण्याचा प्रयत्न केला आणि आमच्या नेत्यांना 100 कोटी रुपयांची ऑफर दिली. त्यांना पक्ष सोडून सोबत येण्यास सांगितले. परंतु त्यांनी ते मान्य केले नाही आणि माझ्यासोबत आले.'' पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत केसीआर म्हणाले, "विश्वगुरु नाही, ते विष गुरु आहेत.''

दरम्याम, टीआरएसच्या चार आमदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यानंतर दुसऱ्याच दिवशी तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 26 ऑक्टोबर रोजी चार टीआरएस आमदारांपैकी एक असलेल्या पी रोहित रेड्डी यांच्या तक्रारीवरून तिघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, 1988 आणि लाच देण्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. नंदा कुमार, रात रामचंद्र भारती उर्फ ​​सतीश शर्मा आणि सिंहयाजी स्वामी अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टीआरएस आमदार रोहित रेड्डी यांनी आरोप केला आहे की त्यांना 100 कोटी रुपयांची लाच देण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि पुढील विधानसभा निवडणूक भाजप उमेदवार म्हणून लढण्यास सांगितले गेले.