Mumbai Lok Sabha Election 2024 : मुंबई : आगामी लोकसभेसाठी (Lok Sabha Election 2024) सर्वच पक्षांमध्ये चुरस दिसून येत आहे. अशातच भाजपच्या (BJP) गोटातून अत्यंत मोठी बातमी समोर येत आहे. भाजप तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत असल्याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. मुंबईत (Mumbai Lok Sabha Elections 2024) भाजपकडून गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांच्या जागी पियुष गोयल (Piyush Goyal)यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे. तर मात्र पूनम महाजन (Poonam Mahajan) आणि मनोज कोटक (Manoj Kotak) यांच्या बाबत ससपेंस अजूनही कायम आहे. तर ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांच्या नावाची चर्चा आहे. 


भाजप मुंबईत तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत आहे. पूनम महाजन, गोपाळ शेट्टी, मनोज कोटक यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, उत्तर मध्य मुंबईतून पूनम महाजन यांच्या जागी शेलारांच्या नावाची चर्चा असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र, आता पक्षश्रेष्ठींचा मान राखूने आशिष शेलार लोकसभा निवडणूक लढवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 


आशिष शेलार लोकसभा निवडणूक लढवणार? (Ashish Shelar Will Contest The Lok Sabha Elections?)


उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातून 2019 मध्ये पूनम महाजन यांनी विजय मिळवला होता. पण, सध्या पूनम महाजनांबाबत मतदारसंघात नाराजी असल्यामुळे त्यांच्या मतदारसंघातून आशिष शेलार यांना या जागेसाठी विचारणा झाली. मात्र, आशिष शेलार यांनी आपण उत्सुक नसून पूनम महाजनांना निवडून आणू असा विश्वास केंद्रीय नेतृत्त्वाला दिली असल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ सूत्रांकडून एबीपी माझाला मिळाली आहे. 


मुंबईत भाजपकडून कोणाला उमेदवारी? (Who Is The Candidate From BJP in Mumbai?)


मुंबईत सध्या भाजपचे तीन खासदार आहेत. त्या तिनही खासदारांचं तिकीट कापून त्यांच्या जागी भाजप इतरांना संधी देण्याच्या तयारी आहे. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी यांच्या जागी पियुष गोयल तर ईशान्य मुंबईत मनोज कोटक यांच्या जागी प्रवीण दरेकर किंवा पराग शहा यांच्या नावाची चर्चा आहे. तर, पूनम महाजन यांच्याबाबत मतदारसंघात नाराजी असल्याने आशिष शेलार यांना या जागेसाठी भाजपकडून विचारणा करण्यात आली..मात्र त्यांनी आपण लढण्यास इच्छुक नसून, पूनम महाजन यांना निवडून  आणू असा विश्वास केंद्रीय नेतृत्वाला दिल्याची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने एबीपी माझाला दिलीय. त्यामुळे या दोन जागाबाबत केंद्रीय नेतृत्व पुन्हा एकदा भाजपच्या राज्यातील नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 


महायुतीत जागावाटपावरुन दबावतंत्र 


महायुतीत सध्या जागावाटपावरून काही अंशी दबावतंत्र वापरलं जातंय. गेल्या आठवड्यात नवी दिल्लीत अमित शाह, मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांची बैठक झाली. या बैठकीत नेमकं काय घडलं त्याचा तपशील एबीपी माझाच्या हाती लागला आहे. 


शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडल्यानं त्यांची ताकद कमी झाली आहे, म्हणून तुम्ही कमी जागा घेतल्या पाहिजेत असं त्यांना सांगण्यात आलं. याचं मुख्य कारण म्हणजे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं एनडीएसाठी 400 पारचं टार्गेट ठेवलं आहे आणि त्यात त्यांना कुठलाही धोका पत्करायचा नाही. तसेच प्रयोग करण्याचा मानस देखील नाही.  


पाहा व्हिडीओ : BJP Mumbai Loksabha : भाजप मुंबईत तीन विद्यमान खासदारांचं तिकीट कापण्याच्या तयारीत