BJP Candidate List : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहे. या यादीत उत्तर महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. 


काही दिवसांपूर्वीच भाजपकडून 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. यात महाराष्ट्राच्या एकाही उमेदवाराचा समावेश नव्हता. मात्र दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 20 जणांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाले आहे. 


उत्तर महाराष्ट्रातून सहा उमेदवारांची नावे जाहीर


उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर येथून सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दिंडोरीतून डॉ. भारती पवार, रावेरमधून रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तसेच धुळे येथून पुन्हा एकदा सुभाष भामरे यांना तर  नंदुरबार येथून डॉ. हीना गावित, तसेच जळगाव येथून स्मिता वाघ यांनी भाजपने उमेदवारी घोषित केली आहे. 


महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी भाजपकडून जाहीर



  1. चंद्रपूर- सुधीर मुनगंटीवार

  2. रावेर - रक्षा खडसे

  3. जालना- रावसाहेब दानवे

  4. बीड - पंकजा मुंडे  

  5. पुणे - मुरलीधर मोहोळ

  6. सांगली - संजयकाका पाटील

  7. माढा - रणजीत निंबाळकर

  8. धुळे - सुभाष भामरे

  9. उत्तर मुंबई - पियुष गोयल

  10. उत्तर पूर्व - मिहीर कोटेचा

  11. नांदेड - प्रतापराव चिखलीकर

  12. अहमदनगर- सुजय विखे पाटील

  13. लातूर - सुधाकर श्रृंगारे

  14. जळगाव -  स्मिता वाघ

  15. दिंडोरी - डॉ. भारती पवार

  16. भिवंडी - कपिल पाटील

  17. वर्धा - रामदास तडस

  18. नागपूर- नितीन गडकरी

  19. अकोला - अनुप धोत्रे

  20. नंदुरबार - डॉ. हिना गावित


कुणाकुणाची तिकीटं कापली? 


भाजपने महाराष्ट्रातील दिग्गजांची नावं जाहीर केली असली तरी अनेक दिग्गजांनी नावं कापली आहेत. यामध्ये प्रामुख्याने भाजपचे उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty) यांचं नाव आहे. गोपाळ शेट्टी यांचं तिकीट कापल्यामुळे त्यांचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यांच्या जागी केंद्रीय मंत्री आणि राज्यसभा सदस्य पियुष गोयल (Piyush Goyal) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. 


याशिवाय बीडमधून पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना तिकीट दिल्याने, त्यांची बहीण प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापलं गेलं आहे.  दुसरीकडे उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात आमदार मिहीर कोटेचा यांना तिकीट देऊन, भाजपने मनोज कोटक (Manoj Kotak) यांना धक्का दिला.


जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट देऊन भाजपने स्मिता वाघ (Smita Wagh) यांना तिकीट दिलं. तिकडे अकोल्यात खासदार संजय धोत्रे यांच्याऐवजी मुलगा अनुप धोत्रे यांना तिकीट दिलं.


आणखी वाचा 


BJP Candidates List : भाजपच्या दुसऱ्या यादीत नितीन गडकरींना उमेदवारी; पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार सुद्धा रिंगणात!