BJP Loksabha Candidate List : भारतीय जनता पक्षाने आज (दि.24) लोकसभा उमेदवारांची पाचवी यादी (BJP Loksabha Candidate List) जाहीर केली आहे. विशेष म्हणजे या यादीतून भाजपने काही महिन्यांपूर्वीच पदावर पायउतार झालेल्या उच्च न्यायालयाच्य न्यायमूर्तींना उमेदवारी दिली आहे. पश्चिम बंगालमधून माजी न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
मनेका गांधी सुलतानपूरमधून रिंगणात
भाजप नेत्या मनेका गांधी यांना उत्तरप्रदेशातील सुलतानपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय उद्योगपती नवीन जिंदल भाजपच्या तिकीटावर कुरुक्षेत्रातून निवडणूक लढणार आहेत. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.मात्र, भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. संबित पात्रा यांना ओडिसाच्या पुरीतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कंगणा राणौत मंडीमधून रिंगणात
अभिनेत्री कंगणा राणौत हिला भाजपने मंडी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेचं तिकिट (BJP Loksabha Candidate List) दिलं आहे. कंगणा राणौत हिने सातत्याने भाजप पुरस्कृत भूमिका घेतली होती. शिवाय महाराष्ट्रात तिने थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी पंगा घेतला होता. त्यामुळे एकप्रकारे तिला तिच्या कामगिरीचे बक्षीसचं मिळालय, असं म्हणता येईल. कंगणा राणौतशिवाय भाजपने आणखी एका कलाकाराला मैदानात उतरवले आहे. छोट्या पडद्यावर गाजलेल्या रामायणात रामाची भूमिका साकारणाऱ्या अरुण गोविल (Arun Govil) मेरठ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.
जयसिद्धेश्वर शिवाचार्यांचे तिकिट कापले, महाराष्ट्रातील 3 उमेदवार जाहीर
भाजपने आज जाहीर केलेल्या पाचव्या यादीत (BJP Loksabha Candidate List) महाराष्ट्रातील 3 लोकसभा मतदारसंघातील नावे घोषित केली आहेत. भाजपने सोलापुरातून प्रणिती शिंदेंविरोधात माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी दिली आहे. तर सुनील मेंढे आणि अशोक नेते यांना पुन्हा एकदा मैदानात उतरवले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या