Halal Certification : हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशनचे (Halal Certification) खाद्यपदार्थ का खावे? हिंदू ग्राहकांनी बाजारातील हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार घालावे. हलाल सर्टिफिकेशन असलेल्या खाद्यपदार्थात काय मिसळलं जातं हे तपासण्याची गरज असून हलाल सर्टिफिकेशनसाठी कंपन्यांकडून वसूल केल्या जाणाऱ्या पैशाचं पुढे काय होते ? त्याचा वापर कुठे होतो? या गौडबंगालाचा शोध सरकारने घ्यावा अशी मागणी भाजप खासदार अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केली आहे. त्यामुळे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी हलाल मटण ऐवजी मल्हार मटणपर्यंत नेलेला मुद्दा आता अनिल बोंडे यांनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या प्रत्येक वस्तूपर्यंत नेत हिंदू ग्राहकांनी त्यावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली आहे. त्यामुळे हलाल सर्टिफिकेशनचा मुद्दा आणखी तापण्याची चिन्ह आहेत.
अनिल बोंडे म्हणाले की, हलाल सर्टिफिकेशन हे मोठं गौडबंगाल आहे. हलाल सर्टिफिकेशन करणारी खाजगी बॉडी असून ते हलाल सर्टिफिकेशनसाठी पैसे गोळा करतात. नंतर हे पैसे कुठे जातात, कशासाठी वापरले जातात, हे कोणाला माहित नाही. आम्ही हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशनचे खाद्यपदार्थ का खावे? आम्ही एफएसएसआय, एगमार्क, आयएसआय मार्क असलेले खाद्यपदार्थ खाऊ. आमचा विश्वास सरकारच्या सर्टिफिकेशनवर राहील, असे त्यांनी म्हटले आहे.
हलाल सर्टिफिकेशनची गरजच काय?
हलाल सर्टिफिकेशन असलेल्या पदार्थांमध्ये काही मिसळलं जातं का याची चौकशी आवश्यक आहे. त्यामुळे मल्हार मटणच्या नावाने जी सुरुवात झाली आहे ती चांगली बाब आहे. हलाल सर्टिफिकेशन आता खाद्य पदार्थांसह कॉस्मेटिक आणि फार्मसुटीकलमध्येही सुरू झालाय. मुस्लीम राष्ट्रांमध्ये वस्तूंची विक्रीसाठी हलाल सर्टिफिकेशन बंधनकारक करत असतील तर त्या देशांमध्ये पाठवल्या जाणाऱ्या वस्तूंपुरता हलाल सर्टिफिकेशन मर्यादित करा. मात्र ज्या वस्तू भारतात विकल्या जातात त्यासाठी हलाल सर्टिफिकेशनची गरजच काय? असा सवाल देखील अनिल बोंडे यांनी उपस्थित केलाय.
हिंदूंनी हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर बहिष्कार टाकावा
हिंदू ग्राहकांनी बाजारातून वस्तू खरेदी करताना सरकारमान्य एगमार्क एफएसएसआय आणि आयएसआय मार्क असलेल्या वस्तू खरेदी कराव्या, हलाल सर्टिफिकेशनच्या मागे लागू नये. हलाल सर्टिफिकेशन असलेल्या वस्तूंवर हिंदूंनी बहिष्कार केला पाहिजे. त्यामुळे आपल्या माध्यमातून या कंपन्यांकडे जाणारा पैसा थांबवता येईल आणि त्याचा गैरवापर थांबवता येईल. हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या संस्थांकडे जाणाऱ्या पैशाचा वापर कुठे होतो? याचा शोध लावण्याची गरज आहे. कारण हलाल सर्टिफिकेशन असलेल्या कंपन्यांनी कधीही पीएम केअर फंडमध्ये किंवा कोरोनासारख्या आपत्तीमध्ये समाजासाठी पैसा दिला असं दिसून आलं नाही. त्यामुळे याचा शोध लागलाच पाहिजे, असेही अनिल बोंडे यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा