Ram Satpute on Sharad Pawar : सध्या माळशिरस ( Malshiras) तालुक्यातील मारकडवाडी (Markadwadi) गावाची राज्यभर चर्चा होत आहे. बॅलेट पेपरवर (Ballot Paper) मतदान (Voting) घेण्यात यावं यासाठी या गावातील ग्रामस्थांनी आंदोलन केलं होतं. तसेच बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी देखील केली होती. मात्र, प्रशासनाच्या आदेशानंतर मतदान प्रक्रिया रद्द झाली. आता याच मारकडवाडीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे उद्या भेट देणार आहेत. दरम्यान, याच मुद्यावर माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे उद्या मी केलेल्या विकास कामांची पाहणी करायला मारकडवाडीत येणार असल्याचा टोला राम सातपुते यांनी लगावला आहे. तसेच मोहिते पाटलांसह आमदार उत्तम जानकर यांच्यावर देखील टीका केलीय,
नेमकं काय म्हणाले राम सातपुते?
उद्या मारकडवाडीत मा. शरद पवार साहेब येणार आहेत. मी केलेल्या विकास कामाची पाहणी करायला असे राम सातपुते यांनी म्हटलं आहे. मागील 5 वर्षात 21 कोटी 89 लाख रुपयांची विकासकामे आम्ही मारकडवाडी मध्ये केली आहेत. मा. पवारसाहेब मारकडवाडीमध्ये आम्ही बोटींग पर्यटन केंद्र पण सुरू केलं आहे, त्याचा पण आपण लाभ घ्यावा असे राम सातपुते यांनी म्हटलं आहे.
मोहिते पाटलांसह उत्तम जानकरांवरही टीका
मोहिते पाटलांचा खोटा Narrative चालणार नाही. शरद पवारसाहेब उद्या येणारच आहात तर मोहिते पाटलांनी बुडवलेल्या पतसंस्था, अकलूज परिसरातील शेतकऱ्यांच्या लुटलेल्या जमिनी, शेतकऱ्यांना लुटत असलेले कारखाने पण पहावेत असे राम सातपुते म्हणाले. शेतकऱ्यांनी कष्टाने उभा केलेला आणि उत्तम जानकर यांनी विकलेला चांदापुरी साखर कारखाना पण पहावा असी टीका देखील सातपुते यांनी केली आहे.
सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार मारकडवाडीत येणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे रविवारी मारकडवाडी (Markadwadi) येथे येणार आहेत. सकाळी साडेनऊ वाजता शरद पवार हे हेलिकॉप्टरने मारकडवाडी येथे येणार आहेत. ईव्हीएम (EVM) विरोधातील देशात मारकडवाडी हे पहिले गाव होते ज्याने बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी आंदोलन केले होते. याच ठिकाणी आता राहुल गांधींसह इंडिया आघाडीचे नेतेही लवकरच भेट देणार असून रविवारी शरद पवार पहिल्यांदा इथे पोहोचणार आहेत.
महत्वाच्या बातम्या: