(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BJP MLA Meeting : मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून विशेष काळजी, भाजपच्या बैठकीत आमदारांची कागदावर मतदान करत रंगीत तालीम
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपाच्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं कशी मते द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत.
Vidhan Parishad Election : विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपच्या आमदारांची रंगीत तालीम घेण्यात आली. भाजपाच्या आमदारांनी कोणत्या पसंतीचं कशी मते द्यावीत याच्या सूचना या बैठकीत करण्यात आल्या आहेत. भाजप आमदारांची विधिमंडळात बैठक पार पडली. या बैठकीत आमदारांना विशेष सूचना देण्यात आल्या आहेत. मतदान कस करावं याची रंगीत तालीम साध्या कागदावर घेण्यात आली. शिवाय, कोणाचं मतदान वाया जाणार नाही, याची काळजी घ्यावी, अशा सूचनाही वरिष्ठांकडून सर्व आमदारांना देण्यात आल्या.
11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत
विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीत (Vidhan Parishad Election) 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरले आहेत. दरम्यान, विधानपरिषद निवडणुकीत मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी भाजप, ठाकरे गट आणि अजित पवारांची राष्ट्रवादी, आणि शिंदे गटाने आपल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतलाय. केवळ काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीने हॉटेल वारीपासून दूर राहण्याचा निर्णय घेतलाय.
क्रॉस व्होटिंग झाले तरच मविआला फायदा
लोकसभा निकालानंतर महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा वरचष्मा पाहायला मिळाला. मात्र, विधानपरिषद निवडणुकीत भाजपची महायुती मजबूत दिसत आहे. सध्याच्या गणितानुसार महायुती 11 पैकी 9 जागा जिंकू शकते. मात्र, लोकसभा निवडणुकीनंतर वातावरण बदलले असून शिंदे गटाचे शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार पलटणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. अशा स्थितीत निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाल्यास त्याचा फायदा महाविकास आघाडीला मिळू शकतो.
समाजवादी पक्ष आणि AIMIM यांचा पाठिंबा
या दोन्ही पक्षांचे 3 आमदार आहेत. त्यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. मात्र, एआयएमआयएमने अद्याप आपली रणनीती स्पष्ट केलेली नाही.
या दोन पक्षांची मते निर्णायक
बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीचे मिळून सुमारे 6 आमदार आहेत. त्यांचा पाठिंबा किंवा विरोध महाविकास आघाडीच्या विजयावर परिणाम करू शकतो.
🕖 6.50pm | 10-7-2024 📍Nariman Point, Mumbai | संध्या. ६.५० वा. | १०-७-२०२४ 📍नरिमन पॉईंट, मुंबई.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 10, 2024
🪷 BJP Mumbai Core Committee meeting under the chairmanship of BJP Maharashtra Prabhari Hon Union Minister Bhupender Yadav ji, SahaPrabhari Hon Union Minister Ashwini Vaishnaw ji.… pic.twitter.com/3FxZhuWtrc