Mahayuti Lok Sabha Election 2024 : भाजप (BJP) मंत्र्याच्या हस्ते शिवसेना (Shiv Sena) शाखेचं (Shinde Group Shakha) उद्घाटन करण्यात आलं आहे. भाजपचे (BJP) मंत्री मंगलप्रभात लोढा (Mangal Prabhat Lodha) यांच्या हस्ते घाटकोपरमधील शिवसेना शाखेचं उद्घाटन पार पडलं आहे. भाजपमंत्र्याच्या हस्ते शिवसेना शाखेचं उद्घाटन, मुख्यमंत्री उपस्थित नसल्याने लोढा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते मुंबईतील घाटकोपरच्या पंतनगरमधील शाखा क्रमांक 131 चं उद्घाटन करण्यात आलं.


शाखा शिवसेनेची आणि उद्घाटन भाजप मंत्र्याकडून


शाखा उद्घाटनासाठी मुख्यमंत्री, शिंदे गटाचे नेते एकनाथ शिंदे हजार राहणार होते, मात्र दुसरीकडे त्यांचा दौरा ठरल्याने मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते या शाखेचे उद्घाटन झाले. भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शिवसेना शाखेचं उद्घाटन केलं. शाखा शिवसेनेची आणि उद्घाटन भाजप मंत्र्याच्या हस्ते कसं असा सवाल सध्या उपस्थित करण्यात येत आहे. 


भाजप मंत्र्याच्या हस्ते शिवसेना शाखेचं उद्घाटन


घाटकोपर पूर्व येथे डीप क्लीन ड्राईव्हासाठी भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते. दुसरीकडे घाटकोपर पंतनगर येथील शिवसेना शाखेच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार होते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सातारा दौऱ्यासाठी रवाना व्हावं लागल्याने त्यांचं शाखआ उद्घाटनासाठी घाटकोपरला येणं रद्द झालं. मात्र, यानंतर भाजप मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, भाजप आमदार पराग शाह यांच्या उपस्थित शिवसेना शाखा क्रमांक 131 चं उद्घाटन पार पडलं.


मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिवसेना शाखेचं उद्घाटन


शिवसेना शिंदे गटाची कार्यालये यापुढे भाजपची कार्यालये होतील, असे आरोप वारंवार यापूर्वी शिवसेना ठाकरे गटाकडून करण्यात येत होते. अशा स्थितीत ज्या वेळी हे शिवसेना शाखेचं उद्घाटन पार पडलं, तेव्हा  उद्धाटनासाठी मुख्यमंत्री शिंदे अनुपस्थित राहणार असल्याने शिंदे गटातील कुण्या मोठ्या नेत्याकडून शाखेचं उद्घाटन होणं, अपेक्षित होते. पण, भाजप मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते शिवसेना शाखेचे उद्घाटन पार पडल्याने राजकीय वर्तुळात याची जोरदार चर्चा रंगली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mahayuti Seat Sharing : अमित शाहांच्या घरी रात्री 1 वाजेपर्यंत बैठक! मुख्यमंत्री, अजित पवार, फडणवीस उपस्थित, दादांना 3-4, शिंदेंना 10-12 जागा, मध्यरात्री काय काय ठरलं?