भिवंडी: भिवंडी लोकसभा मतदारसंघात खासदार कपिल पाटील व भाजपचे आमदार किसन कथोरे यांच्यामध्ये अनेकदा खटके उडाले असताना त्यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाटयावर आला आहे. माजी मंत्री असलेल्या जगन्नाथ पाटील यांनी कपिल पाटील (Kapil Patil) यांच्याविरोधात काम करणाऱ्या किसन कथोरे (Kisan Kathore) यांची पक्षातून हकालपट्टी करा, अशी मागणी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. 


लोकसभा निवडणुकीत कथोरे यांनी मुरबाड विधानसभेतील आगरी भागात तुतारी म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार बाळ्या मामा यांना तर , कुणबी भागात शिलाई मशीन म्हणजे अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांना मतदान करायला कार्यकर्त्यांना सूचना केली या संदर्भातले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याने भिवंडी लोकसभेचे भाजपचे अधिकृत उमेदवार कपिल  पाटील यांच्याविरोधात कथोरे  काम केल्याचे पुरावे असल्याचा गौप्यस्फोट करत  माजी मंत्री जगन्नाथ पाटील यांनी किसन कथोरे यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी  केली आहे.


पत्रात नेमकं काय म्हटलं?


सस्नेह नमस्कार,


लोकसभेच्या निवडणूकीत सर्वानी चांगले काम करून विजय मिळावा यासाठी आपण चांगले प्रयत्न केले त्यावद्दल सर्व कार्यकर्त्यांकडून मनापासून धन्यवाद व आभार मानतो. ४/५ महिन्यापूर्वी आपल्या सागर बंगल्यावर आपण, ना. रविंद्र चव्हाण, श्री. कपिल पाटील, श्री. किसन कथोरे आणि मी अशी वैठक झाली. त्यावेळी श्री कपिल पाटील हयांनी त्यांचे आक्षेप स्पष्ट मांडले. पण श्री. किसन कथोरेनी कोणताही खुलासा केला नाही. पण मी जेष्ठतेच्या नात्याने खासदारांना थांबवले नाही म्हणून नाराजी दाखविली. माझे फोन उचलले नाहीत.


९ एप्रिल २०२४ रोजी आपण त्यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन केले. ३ एप्रिल २०२४ रोजी आपण मुरबाडमध्ये मेळावा घेतला. मा. पंतप्रधान मोदीजी हयांची भिवंडी व कल्याण या दोन मतदारसंघासाठी कल्याणला सभा झाली. त्यावेळी त्याच ठिकाणी पदेशाध्यक्ष मा. श्री. वावनकुळे साहेबांनी ना. कपिल पाटील, श्री. किसन कथोरे, ना. रविंद्र चव्हाण आणि मी उद्या मुरवाडला येतो. जिल्हा परिषदेच्या ४ मेळावे (बैठका) आयोजित करा असे सांगितले. 


पाटील, श्री. किसन कथोरे आणि मी अशी वैठक आपण घेतली व सांगितले की मी उद्या मुरबाडला येतो. ८ जिल्हा परिषदेच्या ४ मेळावे करू तसे आपण आलात दोघांचीही भाषणे झाली आपणही आपल्या पध्दतीने कार्यकार्त्यांना समजावून सांगितले.


त्यानंतर आमदार किसन कथोरेंनी उमेदवार कपिल पाटील त्यांना "पराभूत" करण्यासाठी त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना सांगितले ज्या ठिकाणी "आगरी" समाजाची गावे आहेत. तेथे श्री. बाळ्यामामा म्हात्रे हयांची निशाणी "तुतारी"ला मतदान करा आणि जेथे कुणबी समाजाची गावे आहेत तेथे अपक्ष उमेदवार श्री. निलेश सांबरे यांच्या "शिलाई मशिन"ला मतदान करा, असे ताकीद देऊन सांगितले.


ना. देवेंद्रजी व आपण स्वत:ला जाणवत होते की आ. किसन कथोरे मदत करणार नाही म्हणून आपल्या दोघांच्याही प्रयत्नाला "काडी" चीही किंमत दिली नाही. आ. किसन कथोरेंच्या या वागणुकीमुळे प्रामाणिक कार्यकार्त्यांमध्ये असंतोष आहे. पक्षाचा उमेदवार "पराभूत" करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावली. त्या आमदार किसन कथोरे हयांची पक्षातून हकालप‌ट्टी करावी ही विनंती.


आणखी वाचा


Bhiwandi Lok Sabha : कपिल पाटील तिसऱ्यांदा विजयी होणार की सुरेश म्हात्रे बाजी मारणार? मतदारांचा कौल कुणाच्या बाजूने?