Subhash Desai On Bhushan Desai : शिवसेना ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांचे पुत्र भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी शिवसेना शिंदे गटात (Shiv Sena Shinde Faction) प्रवेश केला आहे. हा ठाकरे गटाला मोठा धक्का मानला जात आहे. यावर आता सुभाष देसाई यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''माझा मुलगा भूषण देसाई याने आज शिंदे गटात प्रवेश केला ही घटना माझ्यासाठी क्लेशदायक आहे. त्याचे शिवसेनेत किंवा राजकारणात कोणतेच काम नाही. त्यामुळे त्याच्या  कुठल्याही पक्षात जाण्याने शिवसेनेवर अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षावर कोणताही परिणाम होणार नाही.'' 


Subhash Desai On Bhushan Desai : काय म्हणाले सुभाष देसाई?


सुभाष देसाई पुढे म्हणाले की, ''शिवसेना, वंदनीय  बाळासाहेब, उद्धवसाहेब व मातोश्रीशी मागील पाच दशकांहून अधिक काळापासून असलेली माझी निष्ठा तशीच अढळ राहील. वयाच्या या टप्प्यावर मी खूप काही करण्याची घोषणा करणार नाही. मात्र इथून पुढेसुद्धा संपूर्ण न्याय मिळेपर्यंत व शिवसेनेचे गतवैभव परत मिळेपर्यंत मी असंख्य शिवसैनिकांच्या सोबतीने माझे कार्य सुरु ठेवणार आहे.'' तत्पूर्वी आज भूषण देसाई (Bhushan Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश केला.






भूषण देसाई यांच्या पक्ष प्रवेशानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले आहेत की, ''मुंबईत यांच्याकडे सत्ता होती गेल्या अनेक वर्ष पण त्यांना काही करता आले नाही. आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन चाललोय. आम्ही करत असलेल्या कामामुळे भूषण देसाई प्रभावी झाले. त्यानंतर त्यांनी पक्षात काम करण्याची इच्छा दर्शवली. भूषण यांनी काम करणाऱ्या लोकांसोबत राहायचा निर्णय घेतला आहे.'' तसेच यावेळी बोलता भूषण देसाई म्हणाले आहेत की, ''बाळासाहेब हेच माझे दैवत आहेत. महाराष्ट्राचा विकास आणि बाळासाहेबांचा विचार पुढे घेऊन जाण्याचे काम एकनाथ शिंदे करत आहेत. मी त्यांचे काम पाहिले आहे. त्यांच्या कामाची पद्धतही माहीत आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.'' 


इतर महत्वाची बातमी: 


Shankar Jagtap : जगताप कुटुंबीय फोडण्यासाठी घरच्यांनीही प्रयत्न केले; अश्विनी जगताप यांच्यासमोर शंकर जगताप यांचं वक्तव्य, चर्चांना उधाण