ठाणे : भिवंडीच्या (Bhiwandi) राजकारणातील मोठी बातमी समोर येत आहे. विद्यमान आमदाराचा राजीनामा दिला आहे. समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून भिवंडी समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी पक्षाकडे आमदारकीचा राजीनामा सोपवला आहे. यानंतर शेकडो महिला कार्यकर्त्या रईस शेख यांच्या कार्यालयाबाहेर समर्थनार्थ एकत्र झाल्याचं पाहायला मिळालं.


भिवंडीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट


सध्या लोकसभा निवडणुकीचं राजकारण तापलेलं असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा दिला आहे. रईस शेख यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला आहे. ही बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरल्यानंतर शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित झाल्या. विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालय सुद्धा बंद करण्यात आलं आहे.


समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम यांचा राजीनामा


भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले असल्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ महिलांच्या भावना तीव्र आहेत. या महिलांनी कार्यालयाबाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. उपस्थित महिला पदाधिकाऱ्यांनी आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर, आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा दिलेला आहे.


राजीनाम्याचं मूळ कारण अद्याप अस्पष्ट


दरम्यान, रईस शेख यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. पण शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे.


दरम्यान, रईस शेख समर्थकांनी सोशल मीडियावर I Stand with Rais Shaikh अशी मोहिम सुरु केली आहे.




 


 






 






 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


भाऊ संभ्रम करत फिरतोय, रोहितला उमेदवारी पवार देत नव्हते, काकी कर्जतला जा म्हणाली; अजितदादांनी कुटुंबातलं A टू Z बाहेर काढलं!