ठाणे : भिवंडी लोकसभा मतदारसंघात (Bhiwandi Lok Sabha Election 2024) महायुती तसेच महाविकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार रिंगणात असतानाच ठाणे आणि पालघर जिल्ह्यात सामाजिक शैक्षणिक आरोग्य विषयक सेवा कार्य करणाऱ्या जिजाऊ संघटनेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी उमेदवारी जाहीर केला. मंगळवारी मोठे शक्तिप्रदर्शन करत त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.


विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथून मंगळवारी सकाळपासून ठिकठिकाणी देवदर्शन करीत भिवंडीत दाखल झाल्यानंतर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणाहून भव्य अशा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये जिजाऊ संघटनेचे भिवंडी, वाडा, शहापूर, मुरबाड, कल्याण या परिसरातील कार्यकर्त्यांसोबतच वंचित बहुजन आघाडी तसेच इतर विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मोठे  शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने केले. 


आमच्या जिजाऊ संघटनेचे मागील पंधरा वर्षांपासूनच काम आहे आणि त्यामुळेच संघटनेच्या कामावर प्रेम करणारे असंख्य नागरिक या ठिकाणी माझ्या समर्थनार्थ उपस्थित झालेले आहेत. दोन आणि तीन तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येणाऱ्या नेत्यांना माझी विनंती आहे की त्यांनी फार लांब न जाता भिवंडी शहरातील भिवंडी तालुक्यातील झालेली दुरावस्था आपण जवळून पाहा. एकट्या बारामतीचा अथवा नागपूरचा विकास झाला म्हणजे महाराष्ट्राचा विकास झाला असं नाही होत. 


त्यांनी भिवंडीच्या जनतेला पाहिल्यानंतर त्यांना समजून येईल की जनतेमध्ये किती असंतोष आहे. नागपूर आणि बारामतीपेक्षा सुजलाम सुफलाम भिवंडी लोकसभा मतदारसंघ करून या भागातील जनतेला आम्ही मोफत शिक्षण पैसे न घेता देतो. जिजाऊच्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्यातील नागरिकांना मोफत शिक्षण आरोग्य या सुविधा उपलब्ध करून देणार आहोत.आम्ही कोणासमोर आव्हान उभं केलं नाही तर आमचा विजय 28 जानेवारीला शहापूर येथील निर्धार मेळाव्यातच झालेला आहे.आम्ही काम केलेले असल्यामुळे संघर्ष करण्याची गरज नाही.आमच्याबरोबर समाज आहे मतदार आहेत ज्यांना हृदय आहे ज्यांना जिजाऊचे  काम माहित आहे ते सर्वच आमच्या सोबत आहेत असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे. 


मी अपक्ष आणि भारतीय काँग्रेस पक्षाच्या नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. माझी उमेदवारी जवळ जवळ फायनल झाली होती परंतु कोणी तरी सुपारी घेऊन बाळ्यामामाचा बळी दिलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भिवंडी लोकसभा क्षेत्रात ताकद नसताना त्यांनी येथे उमेदवारी दिलेली आहे. अजून आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे एबी फॉर्म भेटला तर मी अजूनही काँग्रेसचा उमेदवार असणार आहे असं खळबळजनक विधान निलेश सांबरे यांनी केले आहे.


आमच्याकडे नेता वगैरे काय पद्धत नाही, आम्ही सर्वसामान्यांचे लोकप्रतिनिधी बनणार आहोत त्यामुळे इथल्या लोकांच्या समस्या जाणून घेतलेल्या आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या कुटुंबीयांना घेऊन हा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून केलेल्या आरोग्य व शैक्षणिक जे सेवा कार्य केलेले आहे, त्यांच्या माध्यमातून सहा लाखाहून अधिक मतदान आपल्या पारड्यात पडेल असा विश्वास निलेश सांबरे यांनी व्यक्त केला आहे. 


ही बातमी वाचा: