Bhaskar Jadhav on Nitin Gadkari :  मुंबई-गोवा महामार्गावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यावर शाब्दिक हल्ला केलाय. मुंबई गोवा महामार्ग हा भाजपच्या कामाची पोचपावती आणि कामाची क्षमता दाखवणारा महामार्ग आहे. नितीन गडकरी (Nitin Gadkari) केवळ चांगले भाषण करतात,त्यांची भक्त भाषणे ऐकावीत. सरकार किती नाकर्ते आहे, याचे प्रशस्ती पत्रक म्हणजे मुंबई गोवा महामार्ग आहे. हे सरकार किती निकम्म, तकलादू, ढोंगी, निकामी आहे हे हा रस्ताच सांगेल, असे भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) म्हणाले.  ते कोकणात (Kokan) बोलत होते. 


सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय


भास्कर जाधव म्हणाले,  मराठा आणि ओबीसी समाजात भांडणे लावण्याचा डाव मनोज जरांगे पाटील यांनी हाणून पाडला. सरकार मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करतंय. मनोज जरांगे पाटील यांना सरकार आणखी किती ताटकळत ठेवणार ? छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेऊन मराठा समजला न्याय देऊ असं सरकारने सांगितलं असताना मनोज जरांगे पाटील यांचा अंत कितपत बघणार आहात, असा सवालही भास्कर जाधव यांनी केला. 


सरकारचा मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावून द्यायचा प्रयत्न होता - भास्कर जाधव


सरकारचा मराठा आणि ओबीसी यांच्यात भांडण लावून द्यायचा प्रयत्न होता. जागा वाटपाच्या चर्चा माध्यमांवर पत्रकार परिषद घेऊन होत नसतात. त्यासाठी तीनही पक्षाच्या नेत्यांनी एकत्र बसून निर्णय घ्यायला पाहिजेत. काँग्रेसच्या पत्रकार परिषदेवर भास्कर जाधव यांनी मोठं विधान केलं आहे. जागा वाटपाच्या बाबतीत तिन्ही पक्षाचे नेते एकत्र बसून गोडी गुलाबी ने चर्चा करून लवकरच निर्णय घेतील, असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं. 


पूजा खेडकर प्रकरणात भास्कर जाधव यांनी केलं राज्याच्या सिस्टमला लक्ष केलं


पूजा खेडकर प्रकरणात भास्कर जाधव यांनी केलं राज्याच्या सिस्टमला लक्ष केलं. पूजा खेडकरकडे आढळून आलेल्या बोगस सर्टिफिकेट म्हणजे आपली सिस्टीम किती पोखरलेले आहे किंवा किती भ्रष्ट आहे याचा स्पष्ट पुरावा. पुण्यातील अग्रवाल आणि वरळी हित अँड रन प्रकरणाचा दाखला देत भास्कर जाधव यांचा सिस्टमवर निशाणा साधला. राज्य सरकारचा सिस्टमवर कोणत्याही प्रकारचा वचक नसल्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडतात. राज्याच्या सिस्टीम मध्ये होत असलेले प्रकार गांभीर्याने घेणे गरजेचे आहे, असंही भास्कर जाधव यांनी सांगितलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


IAS Pooja Khedkar : पूजा खेडकरांचा पाय खोलात, दिल्ली क्राईम ब्रँचने फसवणुकीचा गुन्हा दाखल केला