Hingoli: राज्यात सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात विशेष सरकारी वकील म्हणून वरीष्ठ वकील आणि लोकसभेत भाजपकडून निवडणूक लढवलेल्या उज्वल निकमांची नियुक्तीने लाडक्या बहिणींच्या जखमेवर मीठ चोळत असल्याचे टीका आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार टीका केली. हिंगोली जिल्ह्यातील एकूण तीन विधानसभा जागांपैकी दोन जागांवर आमचा हक्क आहे असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेवर लाडकी बहीण योजनेवरून झगा मगा माझ्याकडे बघा असा गाजावाजा मुख्यमंत्र्यांनी थांबवावं असा टोलाही त्यांनी लगावला.
विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच इच्छूक नेत्यांनी तयारीला सुरुवात केली आहे. दरम्यान, हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी आणि हिंगोली या दोन विधानसभेच्या जागांवर उदधव ठाकरेंच्या शिवसेनेचा नैतिक अधिकार आहे. वसमतमध्ये आमचं संघटन चांगलं आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ही जागा शिवसेनेसाठी सोडून देण्याची विनंती करणार असल्याचं ते म्हणाले.
बदलापूर आंदोलन हे राजकीय हेतूने प्रेरित
राज्याचे मुख्यमंत्री जेव्हा अशा पद्धतीने भाषा करतात हे राज्य राज्यकर्त्यांच्या हातामध्ये सुरक्षित नाही हे स्पष्ट दिसत आहे. या अत्यंत गंभीर घटनेबद्दल महाराष्ट्र मध्ये संतपाची लाट असताना सर्व पक्षाचे आणि जाती-धर्माचे लोक रस्त्यावर उतरले होते. तिथे स्वतः मुख्यमंत्री राजकारण करत असतील गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अजित पवार राजकारण करत असतील तर हे निषेधार्य आहे. हे धक्कादायक आहे या संदर्भात मुख्यमंत्री उठसूट चुकीचे स्टेटमेंट करत आहे हे मुख्यमंत्र्यांना शोभणार नाही, असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.
उज्वल निकमांची नियुक्ती जखमेवर मीठ चोळणारी!
उज्वल निकम काही केसेस शेवटाला लावत होते आरोपीला कठोर शिक्षा करत होते असे चित्र निर्माण झाला होतं. लोकसभेची निवडणूक त्यांनी भाजपचे चिन्हावर लढले त्यावेळी त्यांचा खरा चेहरा बाहेर आला होता. त्यानंतर सरकारने भाजपचे चिन्हावर लढलेल्या व्यक्तीला सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती दिली म्हणजे एका बाजूला लाडकी बहीण म्हणून टेंभा मिरवायचा आणि दुसऱ्या बाजूला बहिणीच्या जखमेवर मीठ चोळायचं बहिणींच्या इज्जतेशी किती क्रूर पणे खेळायचे याचाही उदाहरण आहे. असे शिवसेना उबाठा गटाचे आमदार भास्कर जाधव म्हणाले.
दरम्यान, एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरूनही त्यांनी हल्लाबोल केला.
एकाच दिवशी दोन्ही परीक्षा घेऊ नका
एकाच दिवशी दोन्हीही परीक्षा घेऊ नका असे विद्यार्थ्यांचे म्हणणं होतं शासनाकडे आम्ही या विद्यार्थ्यांची कल्पेत मांडली होती शासन आज काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही शासन एवढा मंजूर झाले आहे की शेवटी त्यांना या पैसा आणि सत्तेचा माज आला आहे इडी एन आय ए सीबीआय किंवा पोलिसांच्या एसआयटी चौकशी लावून लोकांना त्यांनी नामोहरण केलं लोकांची पक्ष फोडले आणि सत्ता आणली. आजही ते याच घमंडीत आहेत की आम्ही वापर करून पुन्हा आमची सत्ता आणू. त्यामुळे ते कसेही वागत आहेत याला जनतेने आवर घालण्याची गरज आहे.
मुख्यमंत्र्यांचे प्रत्येक वक्तव्य अशोभनीय
मुख्यमंत्र्यांचा प्रत्येक वक्तव्य अशोभनीय आहे ठरवला मुख्यमंत्री मिळाले की लाडक्या बहीण योजनेला विरोध करणाऱ्यांना चप्पल दाखवा मुख्यमंत्र्यांचे तोंडी हे शब्द शोभतात का मुळामध्ये तुम्ही देताय काय काहीही देत नाहीत 21 वर्षांपूर्वीच्या महिलेला लाभ देता येत का ते तुमची लाडकी बहीण नाही का एका घरात चार 21 वर्षाच्या महिला असतील तर त्यापैकी एक कालाच तुम्ही लाभ देतात 65 वर्षाच्या पुढील महिलेला लाभ देत नाहीत अंगणवाडी सेविका मदतनीस पोलीस पाटील यांना तुम्ही पंधराशे रुपये देणार आहात का झगा मगा आणि माझ्याकडे बघा असा गाजावाजा म्हणजे मुख्यमंत्री करत आहेत त्यांनी तो थांबावा. असेही आमदार भास्कर जाधव म्हणाले.