Suresh Dhas On Sandeep Kshirsagar Beed Crime News: खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये 'नीट' ची तयारी करणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीची छेडछाड आणि लैंगिक छळ प्रकरणी दोन शिक्षकांवर पोस्को अंतर्गत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षकांवरच गुन्हा दाखल झाल्यानं शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून बीड (Beed News) शहरात हे दोघे जण खाजगी कोचिंग क्लासेस चालवतात.

विजय पवार आणि प्रशांत खाटोकर असे या दोन शिक्षकांचे नाव असून विजय पवार याला राजकीय पाठबळ असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. तर आरोपी शिक्षक विजय पवार हा विद्यमान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर (Sandeep Kshirsagar) यांचा कार्यकर्ता असून त्याचे अनेक फोटो सोशल माध्यमावर व्हायरल होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी आक्रमक पवित्रा घेत थेट आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर निशाणा साधला. तर भाजप आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी संदीप क्षीरसागर यांची पाठराखण केल्याचं दिसून येत आहे. 

सुरेश धस नेमकं काय म्हणाले?

लैंगिक शोषण केल्याचा आरोप ज्याच्यावर करण्यात आला आहे, त्याच्यासोबत संदीप क्षीरसागर यांचे काही फोटो आहेत. मुळात त्याचे फोटो हे केवळ संदीप क्षीरसागरसोबत नाही, तर सगळ्या जिल्ह्यातील नेत्यांसोबत आहेत. त्यामुळे त्या सगळ्यांना आरोपी करणार का?, असा सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला. 

धनंजय मुंडे काय म्हणाले?

बेल्सपाल्सी आजारामुळे धनंजय मुंडे मागील बरेच दिवस सार्वजनिक कार्यक्रमापासून दूर होते. धनंजय मुंडे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत होते.. मात्र या दरम्यान ते भाषणांपासून दूर राहिले. परंतु आज अखेर धनंजय मुंडे यांनी आपले मौन सोडून आमदार संदीप क्षीरसागर यांची कोंडी केली. धनंजय मुंडेंसह पंकजा मुंडे यांनी देखील या प्रकरणात आरोपींवर कडक कारवाईची मागणी पोलीस अधीक्षकांकडे केली.

बीडचे खासदार बजरंग सोनावणे काय म्हणाले?

सदर संपूर्ण प्रकरणाचे बीड जिल्ह्यात पडसाद दिसत असून अद्याप संदीप क्षीरसागर अथवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. परंतु राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे यांनी मात्र धनंजय मुंडे यांनी केलेले आरोप बिनबुडाचे असून आरोप करणे सोपे आहे. आरोप करताना त्याला पुरावा असणं गरजेचं आहे. दीडशे दिवस तुम्ही का गप्प बसलात? असा सवाल खासदार सोनवणे यांनी उपस्थित केला.

नेमकी काय घटना काय?

पीडित मुलीकडून पोलिसांकडे देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मी संत भगवान बाबा उच्च माध्यमिक महाविद्यालय खरवंडी कासार येथे 11 वीचे अॅडमीशन घेतले असुन एप्रील 2024 मध्ये उमा किरण कोचिंग क्लासेस येथे नीटचे क्लासेस लावले होते. सकाळी 09.00 ते 12.00 पर्यंत उज्वल अभ्यासिका येथे अभ्यासीका लावली होती व तेथे मी नेहमी अभ्यास करण्याकरीता जात असायचे. जुलै 2024 पासून प्रशांत खाटोकर सर 12.00 वा.सु मी अभ्यासीकेमधून बाहेर येण्याच्या टाईमला माझ्या अभ्यासीकेच्या खाली येवून थांबायचे व मला म्हणायचे तू माझ्यासोबत चल गाडीवर बस, तेव्हा मी त्याला नाही म्हणायचे. क्लासेसचा टाईम दुपारी 2 ते दुपारी 6 पर्यंत असायचा. मी तेथे क्लास रेग्युलर करत होते. प्रशांत खाटोकर सर जे फिजिक्स शिकवतात ते मला क्लास संपल्यानतर तेथील केबिनमध्ये एकटीला बोलवून ते माझी कीस घ्यायचे, माझ्या छातीला व गुप्त अंगाला बॅड टच करायचे. अंगावरील कपडे काढायला लावून माझे ते फोटो काढायचे. कधी कधी ते क्लास संपल्यानंतर क्लासरुम मध्ये कोणी नसताना तिथे सुध्दा ते मला किस करायचे व छातीला व इतर अंगाला बॅड टच करायचे. ते असे माझ्यासोबत वारंवार करत असायचे. मला धमकी द्यायचे की, तू जर घरी कोणाला सांगितले तर मी तुला मारुन टाकेन, अशी धमकी प्रशांत खाटोकर यांनी आपल्याला दिल्याचे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या  तक्रारीत म्हटले आहे.

संबंधित बातमी:

Pune Crime : मोठी बातमी: पंढरपूरला निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, वारकऱ्यांनाही अडवून गळ्याला कोयता, दौंड हादरलं