मुंबईयेत्या पाच तारखेला आम्ही विजय उत्सव करणारच आहोत. यासाठी सर्वांशी बोलणं सुरू आहे. आमच्या सोबत जे-जे या आंदोलनात उतरले होते त्या सर्वांची एकजूट या विजय उत्सवात दाखवण्याची गरज आहे. जेणेकरून या सरकारचा कुटील डाव, मराठी-अमराठी करायचं, मराठी माणसात फूट पाडायची. मात्र मराठी माणसात फूट पडत नाही, हे लक्षात आल्यानंतर पुन्हा मराठी माणूस या लढ्यात एकत्र आल्याचे बघून तो पुन्हा एकत्र येऊ नाही यासाठी सरकारने हा जीआर मागे घेतला. अशी प्रतिक्रिया शिवसेना उबाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी आज मुंबईतील विधान भावनात उद्धव ठाकरे उपस्थित होते त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली. 

शक्तिपीठ महामार्गाचा विषय आहे, या घोटाळेबाज सरकारने केलेल्या अनेक घोटाळ्यांचा विषय आहे, मंत्र्यांची रोज येणारी प्रकरणे आहेत, त्यातील शेतकऱ्यांचे  प्रश्न तसेच प्रलंबित आहे. हे सगळं बघता मला उत्सुकता आहे ही कमळी नेमकी कुठल्या शाळेतून शिकली? कारण मार्क मिळाले 100 पैकी 100 आणि कमळी आमची एक नंबर. त्यामुळे कमळी ही नेमकी कोणत्या शाळेतून शिकली आणि त्या शाळेवर कुठल्या भाषेची सक्ती होती का? की त्या शाळेत ईव्हीएमची मदत होती?  कमळीला एक नंबर म्हणणारे कोण आहेत हे मला पाहायचं आहे, अशी खोचक टीकाही उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. 

राजकीय हेवेदावे विसरून केवळ मराठीसाठी एकत्र आले, त्यांचे आभार-उद्धव ठाकरे

संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाव खेड्यांमध्ये जय महाराष्ट्राचा नारा पुन्हा एकदा बुलंद झाला. आणि हा नारा बुलंद करण्यात शिवसेना आणि शिवसैनिक आघाडीवर होतेच. पण शिवसेनेसोबत ज्या ज्या पक्षांनी मराठी नेते आणि नागरिकांनी आपापले पक्षभेद विसरून सहभाग घेतला त्या सर्वांना मी धन्यवाद देतोय. मात्र सरकारला शहाणपण सुचलं आहे की नाही हे त्या काही दिवसांमध्ये कळेल. पण तूर्तास त्यांनी हिंदी सक्तीचा शासन निर्णय रद्द केला. मात्र जर का हा निर्णय रद्द केला नसता तर मराठी माणसाची एकजूट जी आता एक झाली आहेच ती येत्या 5 जुलै च्या मोर्चात दिसली असती. मराठीसाठी अनेक पक्षातील नेते पक्षीय हेवेदावे विसरून केवळ मराठीसाठी एकत्र आले त्यांचे देखील मी आभार मानतो. कारण मातृभाषेचे प्रेम हे कुठलाही पक्षापेक्षा मोठे असले पाहिजे.

शिक्षणाच्या समितीवर अर्थतज्ञाची नियुक्ती, सरकारने अशी थट्टा करू नये- उद्धव ठाकरे

किंबहुना सरकारने एक केविलवाणा प्रयत्न केला आहे त्यांना देखील आम्ही धन्यवाद देतो. करण्यात एक समिती नेमली असून त्याच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र जाधव यांची नियुक्ती केली आहे. त्यांच्या बुद्धिमत्तेचा  आणि पांडित्याचा आदर राखून मी सरकारला सांगू इच्छितो की अशी थट्टा करू नका. हा शिक्षणाचा विषय असून यामध्ये तुम्ही अर्थतज्ञाची नियुक्ती केली आहे. समिती कोणतीही असू देत मात्र सक्तीचा विषय आता संपलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र वरती आता कोणीही हिंदी सक्ती लादु शकत नाही, निकाल मराठी माणसाच्या एकजुटीतून दिसून आलंय अशी प्रतिक्रिया शिवसेना उभाठा गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी दिली. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन 2025 च्या भूषण गाणे उद्धव ठाकरे हे विधिमंडळात दाखल झाले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली आहे.

ही बातमी वाचा: