Pune Crime: आषाढी वारी (Ashadhi Wari 2025) हा संपूर्ण महाराष्ट्राचा एक महत्त्वपूर्ण सांस्कृतिक व आध्यात्मिक उत्सव मानला जातो. या काळात संपूर्ण राज्यात भक्तीमय वातावरण, उत्साह आणि चैतन्याची लहर पाहायला मिळते. वारीच्या निमित्ताने संतांच्या पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी ‘माऊली-माऊली’चा जयघोष करत विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरकडे निघाले आहेत. आता या वारीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. 

Continues below advertisement


पंढरपूरकडे (Pandharpur) जाणाऱ्या वारकऱ्यांना (Warkari) अडवून लुटल्याची घटना समोर आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पंढरपूरकडे जाताना वारकरी वाटेत चहासाठी थांबले होते. त्यानंतर गाडीत बसताना दोन जण गाडीवरून आले. या दोन जणांनी वारकऱ्यांच्या गळ्याला कोयता लावला. 


पोलिसांकडून अज्ञातांचा शोध सुरु


यानंतर दोन जणांनी वारकऱ्यांना लुटून नंतर अल्पवयीन मुलीला काही अंतरावर नेले आणि तिच्यावर अत्याचार केले आहेत. या घटनेमुळे दौंडमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. पोलीस अज्ञातांचा शोध घेत असून या आरोपींना जेरबंद करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.  


विठुरायाच्या दर्शनाचे बोगस पास विकले


दरम्यान, काही दिवसांपूर्वी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात चालत असलेल्या काही भाविकांना तुम्हाला देवाच्या टोकन दर्शनाचे पास 100 रुपयात देतो, असे सांगून सासवड परिसरात जुन्या पासावर हे नवीन डुप्लिकेट पास बनवून दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. भाविक विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी पोहोचले, तेव्हा प्रवेशद्वारावर स्कॅनिंग करताना ते पास बोगस असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर मंदिर प्रशासनाने तात्काळ कारवाई करत या सात भाविकांना बाजूला घेऊन चौकशी सुरू केली होती. भाविकांना हे पास कोणी तयार करून दिले? याबाबत माहिती सांगता आली नाही आली नव्हती. या घटनेमुळे पंढरपुरात एकच खळबळ उडाली होती.   



इतर महत्त्वाच्या बातम्या


Dharashiv Crime News: जन्मदात्या बापानेच दारूच्या नशेत पोटच्या मुलीला अतिशय क्रूरपणे संपवलं; धाराशिव जिल्ह्यातलं परंडा शहर हादरलं!


Nashik News: बांधकाम साईटच्या कृत्रिम तलावात पोहायला गेले, पाण्याचा अंदाज न आल्याने आक्रीत घडलं; नाशिकमध्ये तीन अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी अंत