बारामती :  बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha Election)  नणंद विरुद्ध भावजय अशी लढत संपूर्ण देशाने पाहिली. पण आता आगामी विधानसभा निवडणुकीत काका विरुद्ध पुतण्या अशी लढत बारामतीत होण्याची चिन्ह आहेत.. बारामती विधानसभा निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar)  विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढाई होणार असा प्रश्न विचारला जातोय.  कारण युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे जयंत पाटील यांनी संकेत दिले आहेत. परंतु विधानसभा निवडणूक लढणार का या प्रश्नावर मात्र युगेंद्र पवार सावध प्रतिक्रिया देत आहेत. 


युगेंद्र पवार म्हणाले,  पवार साहेबांसाठी आम्ही फिरतोय. आजोबांसाठी आम्ही फिरायला लागलो आहे. माझ्या उमेदवारीबद्दल वरिष्ठ निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. मला उमेदवारी मिळणार का जर तरचा विषय आहे. जर ज्येष्ठांनी उमेदवारी द्यायच ठरवलं तर आपण विचार करणार आहे.  बारामतीच नव्हे तर संपूर्ण राज्यात तुतारी वाजेल.  गावकऱ्यांच्या खूप मागण्या आहेत. अजित पवार ज्येष्ठ आहेत. ते माझे काका आहेत त्यामुळे त्यांच्यावर मी काही बोलणार नाही.


दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने शिव स्वराज्य यात्रा काढली यावेळी जयंत पाटील आणि अमोल कोल्हे यांनी त्यांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. 'युगेंद्र पवारांना साथ देऊन आपण नवं नेतृत्व देऊ पाहत आहात',कार्यकर्त्यांना संबोधताना जयंत पाटलांनी वक्तव्य केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर युगेंद्र पवार बारामती विधानसभा निवडणुकीत कमालीचे अॅक्टिव्ह झाले आहेत. युगेंद्र पवारांनी मागच्या 10 दिवसात बारामती तालुक्यातील 100 पेक्षा जास्त गावांचा दौरा केला आहे.   


बारामतीचा दादा बदलायचा आहे, कार्यकर्त्यांची मागणी 


संपूर्ण देशाने नणंद विरुद्ध भावजय अशी लढत बारामती लोकसभा मतदारसंघात पाहिली.. या निवडणुकीत नणंदेने भावजयचा पराभव केला. परंतु आता आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीतून अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवारांनी लढावे अशी मागणी होत आहे. 


कोण आहेत युगेंद्र पवार?



  • अजित पवार यांचे धाकटे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार चिरंजीव

  • युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार 

  • शरयू ग्रुपच्या माध्यमातून युगेंद्र पवार व्यवसायामध्ये सक्रिय

  • फलटण तालुक्यातील शरयू शुगर कारखाना युगेंद्र पवार पाहतात

  • बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आहेत युगेंद्र पवार सध्या त्यांना त्या पदावरून काढल्याची चर्चा आहे


लोकसभा निवडणूक दरम्यान अजित पवारांना धक्का बसल्यानंतर अजित पवारांनी सावध भूमिका घेत पक्ष संघटना पुनर्बांधणीवर भर दिला आहे. मागच्या आठवड्यात झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अजित पवारांनी बारामती तालुक्यातील सगळ्या सेलच्या पदाधिकाऱ्यांना राजीनामा देण्यास सांगितले आहे तर लवकरच नवीन नियुक्ती करण्यास सांगितले आहे. 


अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत सावध


लोकसभा निवडणुकीत धक्का बसल्याने अजित पवारांनी विधानसभा निवडणुकीत सावध झाले आहेत..1995 पासून अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघचे नेतृत्व करीत आहेत. परंतु आता अजित पवारांच्या विरोधात युगेंद्र पवार लढणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कार्यकर्ते देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारी वर ठाम आहेत त्यातच जयंत पाटील यांनी देखील युगेंद्र पवारांच्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. 


हे ही वाचा :


 तू 1500 रुपये परत घेऊन दाखवच, बघते तुझा काय कार्यक्रम करते, सुप्रिया सुळेंचा रवी राणांना इशारा Video