बारामती: आतापर्यंत सर्व सहकार्यांनी मनापासून साथ दिली. 1967 साली मी पहिली निवडणूक लढलो. यंदाची निवडणूक वेगळी आहे. देश कसा चालवायचा हे यंदाच्या निवडणूकीचं उद्दिष्ट आहे, असं शरद पवार (Sharad Pawar) यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे बारामती लोकसभा मतदारसंघाच्या (Baramati Loksabha Election ) उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचारार्थ सासवड येथे आयोजित सभेत शरद पवारांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.


नरेंद्र मोदी आणि त्यांचे सहकारी ज्या पद्धतीने देश चालवतात त्यावर चिंता आहे. पंचायत, जिल्हा परिषद, नगर परिषद निवडणूक झाल्या नाही. लोकसभा आणि विधानसभा या निवडणुक न घेण्याची दुर्बुद्धी या सरकारला सुचू शकते, असा घणाघात शरद पवारांनी केला. देशाची घटना बदलण्यासाठी 400 पार च्या घोषणा दिल्या जात आहे. संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना 400 जागा पाहिजे आहेत, असा आरोप शरद पवारांनी यावेळी केला. 


नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची किंमत ठेवली नाही. झारखंड आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं. हे हुकूमशाहीच्या रस्त्याने निघाले आहेत. लोकशाही उध्वस्त करणार आहेत. त्यामुळे हुकूमशाही करणाऱ्याला खड्यासारखे बाजूला काढू, असं आवाहन शरद पवारांनी उपस्थितांना केलं. देश योग्य दिशेला नेण्याची जबाबदारी आमची आहे, असंही शरद पवार यावेळी म्हणाले. 


नणंद- भावजय अशी लढत-


बारामती लोकसभा मतदारसंघाकडे नणंद- भावजय अशी लढत असली तरीही शरद पवारविरुद्ध अजित पवार अशी लढत पाहायला मिळते आहे. या लोकसभा मतदार संघात दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यात रोज वेगवेगळ्या मुद्यांवरुन सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहे. 


निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न


बारामती काबीज करण्यासाठी दोन्ही पवार कामी लागले आहेत. सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्यासाठी अख्ख कुटुंब मैदानात उतरलं आहे. त्यासोबतच शरद पवारदेखील सभा घेणार आहेत. सगळं पवार कुटुंब अजित पवारांच्या विरोधात असलं तरीही अजित पवार स्वत: सगळीकडे सभा घेताना दिसत आहेत. येत्या काळात बारामती नेमकं कोणते पवार काबीज करणार, हे पाहणं महत्वाचं असणार आहे. 


संबंधित बातम्या: 


Sunetra Pawar : बारामतीकरांची गॅरंटी, वहिनींना विश्वास, विजयाचं गणित काय? सुनेत्रा पवार यांची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत


Sunetra Pawar Vs Supriya Sule : सुप्रिया सुळेंचा मॉॉर्निंग वॉक अन् सुनेत्रा पवारांच्या हाती क्रिकेटची बॅट; शाब्दिक सिक्सर सुरुच!


Supriya Sule : विकास कामांचं श्रेय घेतल्याच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचं अजित पवारांना थेट उत्तर, म्हणाल्या 18 वर्ष...