पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha Election) महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) उमेदवार  सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ होणार आहे. पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेल्या बारामती तालुक्यातील कन्हेरीच्या मारुती मंदिरात सकाळी साडे नऊ वाजता प्रचाराचा  असून शुभारंभ होणार आहे. त्यांना नंतर जाहीर सभा होणार आहे. माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, सुप्रिया सुळे, आमदार रोहीत पवार कार्यकर्त्यांना मार्गशन करणार आहेत. शरद पवारांच्या पहिल्या निवडणुकीचा प्रचाराचा नारळ कन्हेरीच्या मंदिरातून फुटला होता. तेव्हापासून सुरू झालेली ही परंपरा आजतागायत सुरू आहे. आज सुप्रिया सुळे यांचा तर उद्या सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ त्याच मंदिरातून होणार आहे. त्यामुळे पवार कुटुंबियांचे  श्रद्धास्थान असलेला कण्हेरीचा मारुती कोणाला पावणार या कडे सर्वाचे लक्ष लागले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही आपल्या श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन केले नाही. पवार यांनी आपल्या धार्मिक आस्था या नेहमीच सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवल्यात. त्यामुळे शरद पवार हे नास्तिक की आस्तिक अशी कधीतरी चर्चा होत असते. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे पुजारी महादेव शिंदे यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. पवार कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे कन्हेरी येथील मारुती मंदिरावर श्रद्धा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.


57 वर्षापासून आजपर्यंत परंपरा कायम


या मंदिरातूनच प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. केवळ निवडणुकीपुरतं पवार कुटुंब या मंदिरात येतं नाही. अनेकदा सवड मिळेल तेव्हा पवार कुटुंबीय या मारुती मंदिरात येतात अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली. शरद पवार यांनी 1967 साली पहिली  आमदारकीची निवडणूक लढवली. त्यावेळेपासून मारुती मंदिरात नारळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. छोटी असो किंवा मोठी  येथे नारळ फोडूनच प्रचाराची सुरुवात केली गेली आहे. आजही परंपरा आजही जपली गेली आहे. यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरची ही पहिली निवडणूक आहे. नणंद - भावजय यांच्यात जरी ही लढत असली तरी   बारामती काकांची की पुतण्याची याचा फैसला होणार आहे. 


हे ही वाचा :


Ajit Pawar: सुनेत्रा पवारांचा उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी अजित पवार दगडूशेठच्या मंदिरात, म्हणाले मोठा विजय...