बारामती : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election)  तिसऱ्या टप्प्यात सर्वात मोठा ट्विस्ट बारामतीत पाहायला मिळाला आहे. कारण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे (Supriya Sule Visit Ajit Pawar House)  या अजित पवार यांच्या काटेवाडी इथल्या घरी दाखल झाल्या. अजित पवार (Ajit Pawar)  आणि त्यांची आई काटेवाडीत आहेत, त्यांच्या भेटीसाठी सुप्रिया सुळे एकट्याच काटेवाडीत पोहोचल्या. या भेटीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. सुप्रिया सुळे यांनी मतदान केलं आहे. बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात लढत होत आहे. 


सुप्रिया सुळे हे अजित पवारांच्या घरी जाणं हे मोठं प्रातिनिधीक आहे. कारण या भेटीचा परिणाम नक्कीच मतदारांवर होईल, असं राजकीय विश्लेषक सांगतात. पवार विरुद्ध पवार अशी लढाई होत असताना दोन्ही नेते कुटुंब म्हणून एक राहणार असतील, तर मतदार किंवा कार्यकर्ते नक्कीच विचार करतील. 


सुप्रिया सुळेंचा मोर्चा अजित पवारांच्या काटेवाडीतील घरी (Supriya Sule at Ajit Pawar House) 


बारामतीमध्ये मतदान केल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी आपला मोर्चा अचानकपणे काटेवाडी येथील अजित पवारांच्या घरी वळवला. सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या घरी पोहोचल्या त्यावेळी तिथे अजित पवार आणि त्यांची आई आशाताई पवार या होत्या. सुप्रिया सुळे कोणतीही कल्पना न देता अचानक अजित पवारांच्या घरी धडकल्याने चर्चांना उधाण आले आहे. त्या अजित पवारांच्या घरी का गेल्या, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत. आता त्या अजितदादांची भेट घेऊन बाहेर आल्यानंतरच या भेटीमागील कारण स्पष्ट होऊ शकेल.


 सुप्रिया सुळेंच्या भेटीमागे दडलय काय?


अजित पवारांच्या भेटीची चर्चा आता राज्याच्या नाही तर देशात राजकारणात  होणार आहे. सु्प्रिया सुळेंच्या भेटीचा मतदानावर परिणाम होण्याची शक्यता आहे.  प्रचारादरम्यान एकमेकांवरा आरोप प्रत्यारोप करण्यात आले. ऐकमेकांवर विखारी टीका करण्यात आली. निवडणुकीत प्रचाराच्या वेळी पवार वि. पवार अशी लढाई दाखवण्यात आली मात्र  हे कुटुंब एकच आहे. पवार कुटुंबात कोणतेच वितुष्ट नाही, हे एकत्रच राहणार असेल तर आपण कार्यकर्ते म्हणून या लढाईत  सहभागी व्हायचे का? असा मेसेज  कार्यकर्त्यांमध्ये तसेच मतदारांमध्ये जाण्याची शक्यता आहे.  


भेटीनंतर सुप्रिया सुळे काय म्हणाल्या? (Supriya Sule Reaction After Meet) 


सुप्रिया सुळेंनी अजित पवारांच्या काटेवाडीमधील घरी जाऊन अजित पवारांच्या आई आशा पवार यांची भेट घेतली.  यावेळी घरी अजित पवार आणि सुनेत्रा पवार नव्हत्या. काकींना भेटण्यासाठी आपण आलो होतो अस सुप्रिया सुळे म्हणाल्यात.आशा काकींना भेटायला आली होती, त्यांचा आशिर्वाद घ्यायला आली होती.  


भेटीचा मतदानावर काय परिणाम?


बारामतीमध्ये मतदान सुरु होऊन अवघे चार तास उलटले आहेत. मतदानाचे आणखी सात तास शिल्लक आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे आणि अजित पवार  यांच्या भेटीचा मतदानावर काय परिणाम होणार, हे आता पाहावे लागेल.


 


 


Video :