Bajrang Sonawane, Beed : बीड लोकसभा (Beed Loksabha) मतदारसंघ राज्यातील हायहोल्टेज लढतींपैकी एक आहे. त्यामुळे राज्याच लक्ष असलेल्या मतदारसंघात निवडणूक पार पडल्यानंतरही अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी थेट निवडणूक अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे बजरंग सोनवणेंनी धमकी दिली आहे. "कांबळे साहेब हात आकडू नका, अन्यथा स्वत:ला संपवून घेऊ का?", असं बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) म्हणाले आहेत. बजरंग सोनवणेंच्या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बजरंग सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी स्ट्राँग रुमची पाहाणी केली, या दरम्यान त्यांनी अधिकाऱ्यांना धमकी दिली आहे. 


पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर काय म्हणाले?


बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी मतमोजणी केंद्राची पाहणी केलीय. यादरम्यान पोलीस प्रशासनास योग्य त्या सूचना केल्या गेल्यात. चार जून रोजी बीड मधील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय परिसरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. याच ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त लावला गेलाय. आज पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आढावा घेऊन पाहणी केली. संपूर्ण परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असून 4 जून रोजी वाहतुकीत देखील बदल केला गेलाय. तर जिल्ह्यात मनाई आदेश देखील लागू केले आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने साडेचारशे उपद्रवींना आयडेंटिफाय केले असून त्यातील सर्वच लोकांना नोटीसी देण्यात आल्या आहे. तर पोलिसांची विशेष करडी नजर असल्याचा पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितल.


एक्झिट पोलमध्ये बीडचा अंदाज? 


बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे निवडून येतील, पोलस्ट्राटचा अंदाज आहे. दरम्यान, एक्झिट पोलबाबत बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, बीड जिल्ह्यातील निवडणूक ही विकासावरच झाली. जातीपातीची नुसती चर्चा झाली. महाराष्ट्राचा जो मूड महाविकास आघाडीच्या बाजूने आहे. तोच मूड बीड जिल्ह्यात सुद्धा आहे. हे सर्व्हे कसे करतात काय करतात याबाबत मला माहीत नाही. पण, मी बीड लोकसभा निवडणुकीतून शंभर टक्के निवडून येणार आहे, असे त्यांनी म्हटले. बीडच्या लोकसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा मोठा प्रभाव होता. मराठा वि. ओबीसी असा वादही निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Arjun Khotkar : शेतमालाला भाव नाही, पेट्रोलचे दर वाढले, निवडणुकीत ठाकरे-पवारांना सहानुभूती होती : अर्जुन खोतकर