ABP Cvoter Exit Poll नागपूर: महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात शिवसेना किमान 12 ते 13 जागांवर विजय मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने (Krupal Tumane) यांनी केला आहे. एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांचा स्ट्राइक रेट उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या तुलनेत निश्चितच जास्त राहील, असा दावाही तुमने यांनी केला. एक्झिट पोल मध्ये जरी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला कमी जागांवर विजय मिळत असल्याचं दाखवलं जात असलं तरी, चार जूनला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेना 15 पैकी किमान 12 ते 13 जागावर विजय मिळवेल असा विश्वासही तुमाने यांनी व्यक्त केलाय.
शिवसेना 15 पैकी किमान 12 ते 13 जागावर विजयी
लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024 Result) निकालाचे एक्झिट पोल (Exit Poll) समोर आले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या शेवटच्या सातव्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजील संपल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. आतापर्यंत समोर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या 400 पार जागांचा दावा तीन एक्झिट पोल खरा ठरण्याचा अंदाज वर्तवला जात आहेत. चारशे नाही पण पावणे चारशेपर्यंत मजल मारून भाजप केंद्रातील सत्ता राखणार असं एबीपी सी व्होटर सर्व्हे (ABP Cvoter Exit Poll 2024 ) आणि इतर प्रमुख सर्व्हेमधून समोर आलं आहे, पण या एक्झिट पोलमुळे राज्यातील भाजपसमोरची चिंता मात्र वाढण्याची शक्यता आहे. कारण गेल्या वर्षभरापासून भाजपने राज्यात मिशन 45 साठी काम केलं.
पण एक्झिट पोलमध्ये मात्र महायुतीचा आकडा हा 22 ते 26 इतका असल्याचं दिसतंय. त्यापैकी भाजपला 17 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपचे 45 प्लसचे स्वप्न महाराष्ट्रात भंगणार का, भाजपच्या घोडदौडीला महाराष्ट्र लगाम लावणार का असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तरं ही येत्या 4 जून रोजी मिळणार आहेत. मात्र त्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधकांकडून अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. अशातच या एक्झिट पोलच्या अंदाजावरुन महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात शिवसेना किमान 12 ते 13 जागांवर विजय मिळवेल, असा दावा शिवसेनेचे नेते कृपाल तुमाने यांनी केला आहे.
शिंदे गटाला उमेदवार बदलणं पडणार महागात?
शिंदे गटाच्या शिवसेनेला रामटेक मतदारसंघात उमेदवार बदलणं महागात पडणार असल्याची शक्यता आहे. या मतदारसंघात मागील सलग दोन टर्म कृपाल तुमाने जिंकून आले, मात्र यावेळी खासदार कृपाल तुमाने यांचे तिकीट कापण्यात आलं. ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात शिंदे गटाने काँग्रेस उमेदवार राजू पारवे यांना आयात केलं आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. परंतु, राजू पारवे यांच्यापेक्षा कृपाल तुमाने चांगले असल्याचं जनतेचं म्हणणं आहे. त्यामुळे या निर्णयाचा शिंदे गटाला फटका बसणार का? हे पाहणं येत्या 4 जूनला महत्त्वाचं ठरणार आहे.
एबीपी सी वोटर एक्झिट पोल
महायुती
भाजप : 17
शिंदे गट : 6
अजित पवार गट : 1
महाविकास आघाडी
ठाकरे गट : 9
काँग्रेस : 8
शरद पवार गट : 6
इतर : 1
एनडीए (NDA) : 353-383
इंडिया आघाडी (INDIA Alliance) : 152-182
इतर : 4 -12
इतर महत्वाच्या बातम्या