Bachchu Kadu on Mahayuti : आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांचा प्रहार जनशक्ती पक्ष महायुतीतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये चागंला उमेदवार मिळाला, अशी भूमिका बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) महायुतीसोबत आले होते. शिंदे यांच्यासोबत ते गुवाहाटी येथे देखील गेले होते. मात्र, मंत्रीपद मिळाले नसल्याने त्यांनी (Bachchu Kadu) अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती.
आम्हाला महायुतीमध्ये धमक्या दिल्या जातात
आमची मैत्रिपूर्ण लढत असेल. आम्हाला अतिशय ताकदीचा उमेदवार मिळाला असून तो एक लाखांच्या वर मतांनी निवडून येणार आहे. उमेदवार कोण तो 6 एप्रिला जाहीर करू. आमच्या कार्यकर्त्यांची काही नाराजी आहे, मतदारसंघात ताकद असूनही विचारले जात नाही. आम्हाला धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये रोष आहे, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी व्यक्त केली आहे.
बच्चू कडू महायुतीत नाराज
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यानंतर प्रहारचे आमदार बच्चू यांनी ठाकरेंची साथ सोडून महायुतीसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पण त्यानंतर काही ना काही कारणांमुळे बच्चू कडू नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. भाजपकडून आपल्या विरोधात काम केलं जातंय, महायुतीत आपल्याकडे दुर्लक्ष होतंय असं सांगत बच्चू कडूंनी अनेकदा महायुतीला घरचा आहेर दिला होता. आता तर त्यांनी अमरावतीमध्ये महायुतीच्या विरोधात उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे.
एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं
अमरावती लोकसभेसाठी भाजपकडून नवनीत राणा या उभ्या राहणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळेच बच्चू कडू आणखीनच नाराज झाल्याचं दिसतंय. बच्चू कडू आणि राणा दाम्पत्यांमध्ये राजकीय वाद असल्याने बच्चू कडूंनी नवनीत राणांच्या उमेदवारीला सुरूवातीपासूनच विरोध केल्याचं दिसून येतंय. भारतीय जनता पक्ष एखाद्या पक्षाला सोबत घेतो आणि नंतर संपवून टाकतो. एखाद्या पक्षाला सोबत घ्यायचं आणि नंतर ठेचून काढायचं अशा प्रकारचे राजकारण भाजपने केले आहे. हे चालतंय तोवर असंच चालत राहणार आहे, असा आरोप काही दिवसांपूर्वी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी केला होता.
इतर महत्वाच्या बातम्या