Bachchu Kadu on Navneet Rana : "दोन दिवसांपूर्वी रवी राणा म्हणत होता माफी मागतो बच्चू कडू आमचे मोठे भाऊ आहे. आता त्याच भावाला तोडीबाज म्हणतात सरडा तरी दोन दिवसांनी रंग बदलतो. दोन दिवसापूर्वी माफी मागितली होती", अशी टीका आमदार बच्चू कडू यांनी आमदार रवी राणा यांच्यावर केली आहे. बच्चू कडूंनी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. 


एवढ्या वेळेवर कोर्ट कसे चालतात? 


बच्चू कडू म्हणाले, अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीच निकाल कसा येतो? एवढ्या वेळेवर कोर्ट कसे चालतात? यंत्रणेवरचा लोकांचा विश्वास उडत चालला आहे.  रवी राणांनी हरलेल्या मानसिकतेतून टीका केली आहे. चित्र स्पष्ट आहे नवनीत राणांची हार नक्की आहे. राणांच्या रॅलीत आलेल्या लोकांपैकी अर्धी मतं आमचीच आहेत. नवनीत राणा निवडणुकीत तिसरा चौथ्या नंबर वर जाईल. 


राणांनी आपला स्वाभिमान विकला आहे


पुढे बोलताना बच्चू कडू म्हणाले, नवनीत राणाला राष्ट्रवादी काँग्रेसने निवडून दिलं ना मग रवी राणाला अधिकार बोलायचा कसा ? पत्नी बीजेपीमध्ये आणि हे रवी राणा स्वाभिमान पक्षात आहेत. राणांनी आपला स्वाभिमान विकला आहे. पक्षाचे नाव स्वाभिमान आहे पण त्याचा अभिमान कोणाला राहिला नाही. रवी राणा मला मोठा भाऊ म्हणतो माफी मागतो आणि आता तोडीबाज म्हणतो एवढा लाचार माणूस कुठे हिंदुस्तानात सापडणार का? सेटलमेंट दहा ठिकाणी केल्या. रवी राणांनी राष्ट्रवादी-भाजप सोबत राष्ट्रवादीसोबत सेटलमेंट केली.


अस्तित्वात नाही त्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न


काही नसलेल्या गोष्टी उखडून काढल्या जातात. अस्तित्वात नाही त्या गोष्टी काढून बदनाम करण्याचा प्रयत्न केला जाईल. आचार संहितेमध्ये अडकवण्याचा प्रयत्न आहे. राणा या जनतेच्या न्यायालयात हरणार आहेत.  लोकांची  सहानुभूती आता संपली आहे. निवडणुकीत रडणं चांगलं नसतं, असंही बच्चू कडू यांनी म्हटलं. 


नवनीत राणांना 'सर्वोच्च' दिलासा 


नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र उच्च न्यायालयाने अवैध ठरवले होते. दरम्यान, त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयात आज (दि.4) राणा यांच्या जात प्रमाणपत्रावर महत्वपूर्ण सुनावणी पार पडली. सर्वोच्च न्यायलयाने नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध ठरवले आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर नवनीत राणा हमसून रडलेल्या पाहायला मिळाल्या.


इतर महत्वाच्या बातम्या 


VBA Candidates: मोठी बातमी: प्रकाश आंबेडकरांच्या वंचितने परभणीतील उमेदवार अचानक बदलला; हवामान अभ्यासक पंजाबराव डख रिंगणात