Ashok Chavan and Jitesh Antapurkar, नांदेड : भाजपा खासदार अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि देगलुरचे काँग्रेस आमदार जितेश अंतापुरकर यांनी आज (दि. 9) दिल्ली ते नांदेड एकत्रित प्रवास केला. खासदार अशोक चव्हाण आज दिल्लीहून प्रवासी विमानाने नांदेडला आले, तेव्हा त्यांच्या सोबत काँगेस आमदार जितेश अंतापुरकर (Jitesh Antapurkar) दिसल्याने पुन्हा चर्चांना उधान आले आहे.  दरम्यान या प्रवासाबाबत अशोक चव्हाण आणि अंतापुरकर या दोघांनीही सावध प्रतिक्रिया दिली आहे. प्रवासी विमानात अंतापुरकर हे देखील सहप्रवासी होते. आमची विमानात कोणतीही चर्चा झाली नाही असं अशोक चव्हाण म्हणाले. तर काही कामा निमित्ताने मी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीहून नांदेडला येण्यासाठी एकच विमान आहे. योगायोगाने अशोक चव्हाण देखील त्याच विमानात होते , आमची कोणतीही चर्चा झाली नाही असं जितेश अंतापुरकर म्हणाले. यापूर्वी देखील मुंबईत अंतापुरकर यांनी अशोक चव्हाण यांची भेट घेतली होती . तेव्हा देखील त्यांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा रंगली होती. 


काँगेसचे मिशन भोकर , भोकर मतदार संघातून जनसंवाद यात्रेला सुरुवात 


भाजपाचे खासदार अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर मतदार संघावर काँगेसने देखील विशेष लक्ष दिले. भोकर मधून अशोक चव्हाण यांच्या कन्या श्रीजया चव्हाण यांनी तयारी सूरु केली .. आता काँगेसने देखील चव्हाण यांना आव्हान देण्याची तयारी सुरू केली. आज भोकर मतदार संघातील दाभड येथील सत्य गणपती मंदिरातून काँगेसने जनसंवाद यात्रा सूरु केली . अशोक चव्हाण यांनी पक्ष बदलल्यामुळे भोकर मधील कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली. ही राखून ठेवण्यासाठी काँगेसचे प्रयत्न असल्याचे खासदार वसंत चव्हाण म्हणाले.


खासदार वसंतराव चव्हाण यांनी आता पूर्ण भोकर मतदारसंघात आपले लक्ष घातले 


भोकर मतदारसंघातून काँग्रेसने जनसंवाद यात्रा आज पासून सुरू केली आहे. खासदार वसंतराव चव्हाण यांनी आता पूर्ण भोकर मतदारसंघात आपले लक्ष घातले आहे. अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ल्यात आता काँग्रेसची यात्रा निघाला आज पासून निघाली त्यावर अशोक चव्हाण यांनी वसंत चव्हाण यांचा वर टीका केली. भोकर म्हणजे जिल्हा नाही खासदार हा जिल्हाच असतो निवडणूक इतर तालुक्यात सुद्धा होणार आहे.  त्यांनी तिकडे लक्ष घातल्यामुळे आम्हाला बाकी ठिकाणी मोकळीक मिळाचे सुद्धा चव्हाण यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या


बीडमध्ये सुपारी फेकणारे 8 जण ताब्यात; पोलीस अधीक्षकांना राज ठाकरेंचा सवाल, इंटेलिजन्स नाही का?