Ashish Deshmukh, Nagpur : नागपूरमध्ये (Nagpur) अवैध वाळूची वाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले आहेत. अवैध वाहतूक करणारे ट्रक मुख्य राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने जात असताना कारवाई करण्यात आली आहे. रॉयल्टी वाचवण्यासाठी आडमार्गाने मध्यप्रदेशला जात असताना ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले.
रॉयल्टी वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने वाहतूक
भाजप आमदार आशिष देशमुख(Ashish Deshmukh) व स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी अवैध वाळू पकडण्यास पुढाकार घेतलाय. राख व सुपारी माफियांचे अवैध वाहतूक करणारे ट्रक पकडण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ट्रक पकडत असताना भाजप आमदार आशिष देशमुख हे ट्रक वर चढले. त्यानंतर त्यांनी ट्रकमध्ये असलेल्या मालाची पाहणी करत प्रतिक्रिया देखील दिली आहे. हे ट्रक मुख्य राष्ट्रीय महामार्ग सोडून आडमार्गाने रॉयल्टी वाचवत मध्यप्रदेशला जात असताना कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, या निमित्ताने भाजपकडून स्थानिक काँग्रेस नेत्याची नाकेबंदी सुरू केल्याची चर्चा सुरु आहे. त्या पार्श्वभूमीवर भाजपचे स्थानिक पदाधिकारी पण या कारवाईत सहभागी होते.
भाजप आमदार आशिष देशमुख काय काय म्हणाले?
आशिष देशमुख म्हणाले, अवैधरित्या वाहतूक चावळी मोहतकरमार्गे मध्यप्रदेशला सुरु आहे. नक्कीच त्याच्यामध्ये गौडबंगाल आहे. हे रॉयल्टी वाचवून राहिले आहेत. ओव्हरलोड गाड्या चालवत आहेत. सोबतचं टोल देखील अवैधरित्या वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या माध्यमातून ग्रामीण रस्ते खराब करण्याचं काम हे लोक करत आहेत. याचा पर्दाफाश करण्यासाठी मी पोलिसांना सांगितलेलं आहे. त्यापद्धतीने सुपारी आणि तंबाखूची देखील वाहतूक होतं आहे. लाखो रुपयांचा कर चुकवण्याचा प्रयत्न सुर आहे. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही केलेली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या