Uddhav Thackeray News: माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज अंधेरी पोटनिवडणुकीच्या विजयानंतर पंतप्रधान मोदींवर देखील निशाणा साधला आहे. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केंद्र सरकार मोठ्या गोष्टी करत असतं. गुजरातच्या निवडणुका जाहीर होईपर्यंत महाराष्ट्रात येणारे जमिनीवरील प्रकल्प तिथे ओरबाडून नेले. आणि आता अचानक पंतप्रधानांच्या तोंडातून महाराष्ट्राबद्दल प्रेम व्यक्त होऊ लागलं आहे. जमिनीवरील प्रकल्प गुजरातला आणि हवेतील प्रकल्प महाराष्ट्रात आणले जात आहेत. हे प्रकल्प जाहीर केल्यानंतर या प्रकल्पांचा भ्रमाचा भोपळा फुटण्याआधी मध्यावधी निवडणुका जाहीर होऊ शकतात असा माझा अंदाज आहे, असं  उद्धव ठाकरे यांनी ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर बोलताना म्हटलं आहे. 


उद्धव ठाकरे म्हणाले की, गुजरातमधील निवडणुकीसाठी काही इच्छुक आले आहेत. पण आम्ही संपूर्ण ताकदीने ही निवडणूक लढवणार नसल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेत आपण सहभागी होऊ का नाही हे नक्की नाही, पण आपले नेते सहभागी होतील असं देखील ते म्हणाले. 


जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सरकार त्या राज्याचा विचार करतं


माजी राज्यमंत्री व माजी खासदार रमेश दुबे यांच्या 'मेरी अमृत यात्रा' या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते उद्धव ठाकरे म्हणाले की, मी कालच सांगितले की तयार राहा की मध्यावर्ती निवडणुका लागतील.  मला लोकांनी सांगितले की असे अनुमान कसे. महाराष्ट्राला तुम्ही काय उल्लू समजले आहे का? असा सवाल करत ते म्हणाले की, जेव्हा निवडणुका येतात तेव्हाच हे सरकार त्या राज्याचा विचार करतं, असंही ते म्हणाले. आधी जे समोर होते ते आता सोबत आहेत आणि जे आधी साथीला होते ते समोर आहेत. पण त्यांनी मुखवटा चढवला आहे, असंही ते म्हणाले. 


जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट


"जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट केलं. ही आता सुरूवात झाली आहे. लढाईची सुरूवातच विजयाने झाली आहे. या पुढचे देखील सर्व विजय मिळवेन. आमचं नाव आणि चिन्ह गोठवलं. परंतु, ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवलं ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कुठलं पण असो जनता आमच्यासोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय नोटाला जी मतं पडली तीच मतं विरोधकांना पडली असती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी यावेळी भाजपसह शिंदे गटाला लगावला.  


ही बातमी देखील वाचा


Andheri Bypoll Result :मशाल भडकली, भगवा फडकला; लटकेंच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया