Ankita Patil Thackeray : भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे आज मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. पाटील आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाणार असल्याची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच त्यांची मुलगी अंकिता पाटील ठाकरे (Ankita Patil Thackeray) या देखील भाजपच्या युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षपदाचा आज राजीनामा देणार आहेत.
विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार
दरम्यान, याबाबत प्रसारमाध्यमांशी बोलताना अंकिता पाटील म्हणाल्या की, हर्षवर्धन पाटील साहेब जे काही आहे ते पत्रकार परिषदेत बोलतील. कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की, साहेबांनी शरद पवार पक्षात प्रवेश करावा, याबाबात साहेबच स्पष्टीकरण देतील असेही अंकिता पाटील म्हणाल्या. भाजपच्या सर्व पदांचा मी आज राजीनामा देणार असल्याचे अंकिता पाटील यांनी सांगितले. विधानसभेची निवडणूक समोर ठेवून युवा पदाधिकारी कार्यरत राहणार असल्याचे अंकिता पाटील म्हणाल्या.
महत्वाच्या बातम्या: