Anil Deshmukh: मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आज मुंबई सत्र न्यायालयात (Mumbai Session Court) पुन्हा खाजगी रुग्णालयात (Private Hospital) उपचार करण्याची परवानगी मिळविण्यासाठी अर्ज केला आहे. मात्र या अर्जावर येणाऱ्या 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. देशमुख यांनी आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर स्वतः युक्तिवाद केला. “मी कारागृहामध्ये चार वेळा चक्कर येऊन पडलो आहे. माझी प्रकृती अद्यापही स्थिर नाही. मला खाजगी रुग्णालयात उपचाराकरीता परवानगी देण्यात यावी, अशी विनंती देशमुख यांनी स्वतः आज न्यायालयासमोर युक्तिवाद करताना केली आहे.


देशमुखांचा स्वतः न्यायाधीशांसमोर युक्तीवाद


विशेष सत्र न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यासमोर स्वतः देशमुख यांनी युक्तिवाद केला. माझी प्रकृती गेल्या अनेक दिवसांपासून ठीक नाही. मी आतापर्यंत चार वेळा कारागृहामध्ये चक्कर येऊन पडलो आहे. यापूर्वी देखील माझ्या हाताला मोठ्या प्रमाणात दुखापत झाली होती. बाथरूममध्ये पडल्यानंतर नवाब मलिक यांनी जेल प्रशासनाला ताबडतोब माहिती दिल्यानंतर माझ्यावर उपचार करण्यात आले होते.


देशमुखांच्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी


खाजगी रुग्णालयामध्ये उपचार करण्याकरीता न्यायालयाने परवानगी द्यावी, अशी मागणी देशमुख यांनी न्यायालयासमोर आज केली. यावर यासंदर्भात तुम्ही कोर्टासमोर लेखी अर्ज करा, असे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी सांगितले. मात्र त्यानंतर अनिल देशमुख यांच्या वतीने कोर्टासमोर लेखी अर्ज दाखल करण्यात आला. अनिल देशमुख यांनी आज केलेल्या अर्जावर 6 सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे.


जेष्ठ वकील विक्रम चौधरींनीही मेडिकल ग्राऊंडवर जामीनाची केली होती विनंती 


यापूर्वी अनिल देशमुख यांच्या मुंबई उच्च न्यायालयातील जामीन अर्जावर सुनावणी दरम्यान जेष्ठ वकिल विक्रम चौधरी यांनी देखील न्यायालयासमोर युक्तिवाद करताना म्हटले होते की, अनिल देशमुख यांचे वय वाढत असल्याने त्यांना असलेले आजार देखील वाढत आहेत. दरम्यान, खांद्यावरील शस्त्रक्रियेसाठी देखील मे महिन्यात देशमुख यांनी न्यायालयाकडे खासगी रुग्णालयात उपचारासाठी परवानगी मागितली होती. त्यावेळीही न्यायालयाने त्यांची विनंती स्वीकारली नव्हती. त्यावेळी न्यायालयाने त्यांना खासगी रुग्णालयाऐवजी जे.जे. रुग्णालयात (JJ Hospital) उपचाराची परवानगी दिली होती.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Maharashtra Corona Update : राज्यात बुधवारी 1600 रुग्णांची नोंद तर रिकव्हरी रेट 98.04 टक्के
Dasara Melava 2022 : खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच, दसरा मेळावाही त्यांचाच होणार - नारायण राणे