मुंबई : राज्यात आज 1600 कोरोनाच्या (Maharashtra Corona Update) नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर आज दिवसभरात एकूण 1864 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. 

Continues below advertisement

पाच कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू (Maharashtra Corona Death) 

राज्यात  पाच कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यूदर हा 1.83 टक्के इतका झाला. तर आतापर्यंत राज्यामध्ये 79,41, 458 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे कोरोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 98.04 टक्के इतकं झालं आहे. 

राज्यात एकूण 10633 सक्रिय रुग्ण (Maharashtra Corona Active Cases) 

राज्यात एकूण 10633 सक्रिय रुग्ण संख्या आहे. त्यामध्ये  मुंबईत सर्वाधिक म्हणजे 4257  इतके रुग्ण असून त्यानंतर ठाण्यामध्ये 2380  सक्रिय रुग्ण आहेत. 

Continues below advertisement

 मुंबईत बुधवारी 638 रुग्णांची नोंद (Mumbai corona cases)

कोरोना रुग्णांची संख्या मुंबईसह महाराष्ट्रात वाढत आहे. आज मुंबईत 638 रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईत मंगळवारी 769 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या 11,20,868 वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत चार रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,698 झाली आहे. सध्या मुंबईत 4,257 रुग्ण आहेत. दरम्यान मुंबईत आढळलेल्या नव्या 638 रुग्णांमध्ये 594  म्हणजे 93 टक्के रुग्णांना  अधिक लक्षणं नसल्याने  मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.