Anil Deshmukh On Devendra Fadanvis: तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या समित कदमला पाठवत प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. तसेच उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितले असल्याचा दावा माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर (Devendra Fadanavis) केलाय. जेल में जाओ नही तो बीजेपी में आओ असं त्यांचं धोरण असल्याचं देशमुख म्हणाले. 


उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुख यांना महापालिका निवडणुकीसाठी पैसे मागितले असा आरोप करण्यात आला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला होता. फडणवीसांनी पाठवलेला आहे का खास माणसाने तीन वर्षांपूर्वी ही ऑफर दिल्याचे देशमुख यांनी सांगितले होते. या खास माणसाचे नाव त्यांनी आज उघड केले असून  फडणवीस आणि समीत कदम यांच्यातील जवळच्या संबंधांना फोटो दाखवत त्यांनी माध्यमांसमोर दाखवले आहे.


समित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध 


तीन वर्षांपूर्वी फडणवीसांनी मिरजेच्या समित कदमला प्रतिज्ञापत्र घेऊन माझ्याकडे पाठवलं होतं. त्यानेच प्रतिज्ञापत्र करून द्या असं सांगितलं. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार यांच्यावर खोटे आरोप करण्यास सांगितलं. सुमित कदम आणि फडणवीस यांचे जवळचे संबंध असून त्यांचे फोटो आहेत. सुमित कदम यांची पत्नी फडणवीस यांना राखी बांधते. असे सांगत अनिल देशमुख यांनी तसे फोटो माध्यमांना दाखवले. 


समित कदम साधारण कार्यकर्ता आहे. तो साधा नगरसेवकही नाही. तरीही त्याला वाय सुरक्षा देण्यात आली. मी जर तीन वर्षांपूर्वी त्यांनी पाठवलेल्या मुद्द्यांवर प्रतिज्ञापत्र दिलं असतं तर उद्धव ठाकरेंच्या अडचणी वाढल्या असत्या, असं अनिल देशमुख म्हणाले. 


राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न 


खोट्या आरोपांखाली उद्धव ठाकरेंना अडकवणं मी समजू शकतो. ते राजकीय विरोधक आहेत. मात्र राजकीय नेत्यांच्या मुलांना अडकवण्याचा फडणवीस यांचा प्रयत्न आहे. 


उद्धव ठाकरे यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांनी दिशा सलियानवर बलात्कार करून बालकणीतून ढकलून दिल्याचा आरोप सुद्धा करण्यास त्यांनी सांगितले होते असा संसाराटी धावा महाविकास आघाडी सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला होता. 


बात निकली है तो दूर तक जायेगी...


तीन वर्षांपूर्वी फडणवीस यांनी समित कदम यांना माझ्याकडे पाठवलं. माझ्याकडे ते ऍफिडेविट घेऊन आले होते. नगरसेवक नसलेल्या माणसाला फडणवीस यांनी वाय दर्जाची सुरक्षा दिली. यापूर्वी पेन ड्राईव्ह दाखवत माझ्याकडे काही क्लिप्स आहेत त्या वेळ आली की मी बाहेर काढेन असा इशारा त्यांनी फडणवीसांना दिला होता. यावर विचारले असता बात निकली है तो दूर तक जायेगी असं म्हणत त्यांनी सगळं हळूहळू समोर येईल असं त्यांनी सांगितलं.


हेही वाचा:


Anil Deshmukh on Devendra Fadnavis : उद्धव ठाकरेंनी पैसे मागितल्याचा, आदित्यने बलात्कार केल्याचा आरोप करण्यास सांगितला; अनिल देशमुखांचा सनसनाटी दावा


Sanjay Raut: अनिल देशमुखांना भेटणाऱ्या समित कदमला वाय दर्जाची सुरक्षा कोणी दिली? देवेंद्र फडणवीसांनी आणखी कोणाकोणाला सुरक्षा दिली, हे खोदून काढू: संजय राऊत