Amol Kolhe and Shivena Thackeray Group : मंचरमध्ये महाविकास आघाडीमध्य बिघाडी झालेली पाहायला मिळाली होती. शिरुर लोकसभेत विजयी झाल्यानंतर अमोल कोल्हेंच्या सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अमोल कोल्हे यांनी देवदत्त निकम यांचा भावी आमदार म्हणून उल्लेख केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी राडा केलाय. भावी आमदार म्हणून उल्लेख केल्यानंतर एकप्रकारे मतदारसंघावरच दावा केल्याचे शिवसैनिकांकडून बोलले जाऊ लागले. त्यामुळे मंचरमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली होती. यावर आता अमोल कोल्हे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
काय म्हणाले अमोल कोल्हे?
अमोल कोल्हे म्हणाले, मुळात मी कोणती उमेदवारी जाहीर केलेली नाही. मी भावी आमदार म्हणून उल्लेख केला, त्याला थोडी पार्श्वभूमी आहे. ही या मतदारसंघातील काही नेत्यांना ठाऊक आहे. दुर्दैवाने लगेच अजान सुरु झाल्याने मला थांबावे लागले. त्यानंतर मी त्याचे स्पष्टीकरण देऊ शकलो नाही. शिवसैनिक त्वेषाने लढला नसता तर माझा विजय शक्य झाला नसता. मला उमेदवारी जाहीर करण्याचा कोणताही अधिकार नाही. महाविकास आघाडीचे नेते जो निर्णय घेतील, तो आम्हा सर्वांना मान्य असणार आहे, असा विश्वासही अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
शिवसैनिकांनी जीव तोडून काम केलं, याची मला जाणीव आहे
केवळ राजकीय सभ्यता म्हणून अजानसाठी थांबावे लागले. या थांबण्याच्या पॉजमुळे गैरसमज निर्माण झाला. मी जे बोललो त्याला एक पार्श्वभूमी आहे. बैलगाडा घाटामध्ये जो उल्लेख केला होता. त्यानंतर नेमका काय किस्सा घडला तो सांगायचा होता. तो सांगायचा होता. मी खासगीत त्यांना सांगेन. शिवसैनिकांनी जीव तोडून काम केलं, याची मला जाणीव आहे.मतदारसंघाबाबत निर्णय महाविकास आघाडीचे नेते करतील. शिरुर लोकसभा मतदारसंघात देखील शिवसेनेला उमेदवारी मिळणार आहे. मी केवळ भावना व्यक्त केल्या. अजान सुरु झाल्यानंतर भाषण थांबवणे हा संकेत असतो, म्हणून स्पष्टीकरण देता आले नाही, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
प्रचारात देखील आमचा अपमान झाला,आमची बदनामी करण्यात आली
आम्ही फक्त तुमच्याकडे (अमोल कोल्हे) पाहून येतो. प्रचारात देखील आमचा अपमान झाला. आमची बदनामी करण्यात आली. आम्हाला शिवसैनिकांनी उठवलं. आम्ही सभा स्थळावरुन उठत नव्हतो, अशी भूमिका घटनास्थळी कार्यकर्ता मांडताना दिसत आहेत. दुसरीकडे अमोल कोल्हे त्यांची समजूत काढताना दिसत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या
Amol Kolhe and Shivena Thackeray Group : अमोल कोल्हेंकडून देवदत्त निकमांचा 'भावी आमदार' म्हणून उल्लेख, ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा, शाब्दिक बाचाबाची