एक्स्प्लोर

Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...

Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा 'अपघात' नाही, तर प्रशासनाने केलेला 'खून' आहे! असं म्हणत अमित ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई: मुंबईतील मुलुंड (पश्चिम) परिसरात शनिवारी (१४ फेब्रुवारी) दुपारी मेट्रो बांधकामाच्या दरम्यान गंभीर अपघात घडला. एलबीएस रोड (LBS Road) वरील बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो पिलरचा सिमेंटचा एक भाग अचानक तुटून (Mumbai Accident Metro Slab Collapsed) खाली पडला. हा तुकडा रस्त्यावरून जात असलेल्या ऑटो रिक्षा आणि एका कारवर कोसळला. ही घटना जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीजवळ घडली. या दुर्घटनेत ऑटोमध्ये प्रवास करणाऱ्या तीन ते चार जण जखमी झाले तर एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला.(Mumbai Accident Metro Slab Collapsed) या घटनेनंतर मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे, अशातच मनसे नेते अमित ठाकरे यांनी याबाबत संतापजनक पोस्ट शेअर केली आहे.

अमित ठाकरेंची पोस्ट काय?

अमित ठाकरेंनी पोस्टमध्ये म्हटलंय की, "मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला. हा 'अपघात' नाही, तर प्रशासनाने केलेला 'खून' आहे! निकृष्ट दर्जाचं काम, सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवून केलेला 'जुगाड' आणि वारंवार ताकीद देऊनही झालेलं दुर्लक्ष... याची जबाबदारी कोण घेणार?", अशा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

"एकीकडे सरकारच्या हलगर्जीपणामुळे सामान्य मुंबईकरांच्या डोक्यावर मृत्यूचे स्लॅब कोसळत असताना, दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवर गाणी वाजवणारे रस्ते बनवून स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न आहे. जपानची नक्कल करताना सरकार हे विसरतंय की तिथल्या जनतेला 'जिविताची हमी' आणि सर्व 'मूलभूत सोयी' मिळाल्या आहेत; आपल्याकडे घराबाहेर गेलेला माणूस जिवंत घरी परतेल की नाही याची खात्री नसताना हे बालिश हट्ट कशासाठी? प्रशासनाचा प्राधान्यक्रम नक्की काय आहे? ज्या गोष्टींची गरज नाही तिथे कोट्यवधी रुपये उधळायचे आणि जिथे लोकांच्या जिवाचा प्रश्न आहे तिथे मात्र रीतसर दुर्लक्ष करायचं?", असंही पुढे अमित ठाकरे म्हणालेत.

"दुर्दैवाने, हा काही पहिलाच 'अपघात' नाही. अशा अनेक घटना मुंबईकरांच्या जीवावर बेतल्या आहेत. कधी पूल कोसळतो, कधी होर्डिंग तर कधी बांधकामाचे स्लॅब अंगावर पडून निष्पाप लोकांचे प्राण जातात. जास्तीत जास्त चौकशीचे आदेश दिले जातात, पण परिस्थिती बदलत नाही. अनियंत्रित गर्दीमुळे होणारे रेल्वे अपघात, निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांमुळे लोकांचे जाणारे प्राण याची तर सरकार दरबारी दखलही घेतली जात नाही! धक्कादायक बाब म्हणजे, मुलुंड प्रकरणी कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड होतो, पण ज्या कुटुंबाचा आधार गेला त्यांना फक्त ५ लाखांची शुल्लक मदत ? एखाद्या कुटुंबाची राखरांगोळी झाल्यावर त्यांच्या दुःखाची अशी 'शून्यात' गणना करताना सरकारला लाज कशी वाटत नाही?", अशा शब्दात ठाकरेंनी संताप व्यक्त केला आहे.

"नुकतीच अमेरिकेतील एका अपघाताची बातमी आपण वाचली. तिथल्या प्रशासनाच्या चुकीमुळे एका भारतीय मुलीचा मृत्यू झाला, तेव्हा तिथल्या सिस्टीमने जबाबदारी स्वीकारून कोट्यवधींची भरपाई दिली. प्रगत राष्ट्रांमध्ये माणसाच्या जिवाला किंमत असते, पण आपल्याकडे? आपल्याकडे लोकांच्या जिवापेक्षा सरकारला 'इव्हेंटबाजी' महत्त्वाचे वाटते. आम्हाला गाणी गाणारे रस्ते नकोत, तर दर्जेदार रस्ते हवे आहेत! मुंबईकर टॅक्स भरतोय तो तुमच्या 'इनोव्हेटिव्ह स्टंट'साठी नाही, तर एका सुरक्षित आयुष्यासाठी... त्यामुळे हे असले 'म्युझिकल' नखरे थांबवा आणि आधी लोकांना एक सुरक्षित आयुष्य देण्याची 'बेसिक' मागणी पूर्ण करा.जनतेच्या जिवाशी चाललेला खेळ थांबवा !", अशी मागणी अमित ठाकरेंनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
South Delimitation Demand : मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला दक्षिणेतील मुख्यमंत्र्यांचा विरोध? राजकीय नुकसानीचा मुद्दा, अमित शाहांसमोर मोठी मागणी
Shiv Sena Symbol Case :  तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे
तुमचे अधिकार वापरा अन् शिंदेंच्या आमदारांना अपात्र करा; ठाकरेंच्या वकिलांच्या युक्तिवादातील 20 मोठे मुद्दे

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा

Embed widget