भंडारा: उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे सतत म्हणत असतात की, भाजपने आमचा  पक्ष फोडला. मात्र, या दोघांचेही पक्ष भाजपने फोडलेले नाहीत. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचे आपापल्या अपत्यांवर असणारे प्रेमच पक्षफुटीसाठी कारणीभूत ठरले, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी केले. ते रविवारी भंडाऱ्यातील साकोली येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.


यावेळी अमित शाह यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले. त्यांनी म्हटले की, उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतात की, भाजपने आमचा पक्ष फोडला. पण मी आज महाराष्ट्राच्या जनतेसमोर एक गोष्ट स्पष्ट करतोय की, आम्ही शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडलेला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली आणि शरद पवार यांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला, असे अमित शाह यांनी ठणकावून सांगितले.


अमित शाह मातोश्रीवर लोटांगण घालायला आले होते तेव्हा घराणेशाही दिसली नाही का? उद्धव ठाकरेंचा सवाल


सध्याच्या घडीला महाराष्ट्रात अर्धी शिवसेना आणि अर्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिल्लक आहे. या दोघांनी मिळून काँग्रेस पक्षालाही अर्धेमुर्धे केले आहे. हे तीन अर्धवट पक्ष कारभार करु शकतील का? महाराष्ट्राचं भलं केवळ नरेंद्र मोदी आणि भाजप हेच करु शकतात. ही देशाची निवडणूक आहे. पंतप्रधान मोदींनी जगभरात भारताला पुढे नेण्याचं काम केलं आहे, असे अमित शाह यांनी सांगितले. 


शरद पवारांनी भंडारा-गोंदियासाठी काय केलं? अमित शाहांचा सवाल


साकोली येथील सभेत अमित शाह यांनी शरद पवार यांना लक्ष्य केले. शरद पवार यांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही सोनिया मनमोहन यांच्या सरकारमध्ये मंत्री होतात. मात्र त्या दहा वर्षात तुम्ही आम्हाला काय दिलं होतं?? भंडारा-गोंदिया साठी काय केलं होतं?, असा सवाल अमित शाह यांनी विचारला. त्यापेक्षा कितीतरी जास्त नरेंद्र मोदी सरकारने महाराष्ट्राने भंडारा-गोदियासाठी केलं आहे, असा दावा अमित शाह यांनी केला.


आणखी वाचा


'ज्या काँग्रेसने बाबासाहेबांचा पराभव केला, तेच आता बाबासाहेबांच्या नावाने मतं मागताय', अमित शाहांचा घणाघात