Sujay Vikhe Patil on Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना, "बाहेरचे पवार आणि ओरिजनल पवार" असं वक्तव्य केलं होतं. यावरून मागील लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Election) संदर्भ देत सुजय विखे पाटलांनी (Sujay Vikhe Patil) शरद पवारांवर निशाणा साधला आहे. 


गेल्या निवडणूकीत शरद पवार म्हणाले होते "मी फक्त माझ्या नातवाकडे पाहिल, दुसऱ्याच्या नातवाचं मला घेणं नाही", या एका वक्तव्यामुळे माझी (सुजय विखे) निवडणूक बदलली होती. त्यावेळी सुजय विखे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून (Ahmednagar Lok Sabha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून (NCP) निवडणूक लढवतील अशी चर्चा होती. 


सुनेत्रा पवार मोठ्या फरकाने निवडून येतील 


मात्र शरद पवारांनी त्यांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नव्हती. त्यामुळे ते भाजपमध्ये गेले आणि उमेदवारी मिळाली. हा संदर्भ देत सुजय विखे यांनी शरद पवारांवर निशाणा साधला. "जशी माझी निवडणूक त्यावेळी बदलली होती तशीच आता बारामतीची निवडणूक बदललेली दिसेल", सुनेत्रा पवार मोठ्या फरकाने निवडून येतील, असा विश्वास सुजय विखे यांनी व्यक्त केला आहे.


भारताच्या विकासाचे मुद्दे भाजपच्या जाहीरनाम्यात


आज भाजपने आपला जाहीरनामा (BJP Manifesto) सादर केला. यावर बोलताना नगर दक्षिणचे भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी म्हंटलं की, गेल्या निवडणूकीत भाजपने आपल्या जाहीरनाम्यात जे जे मुद्दे घेतले होते ते पूर्ण केले. मग तो कलम 370 चा असो की राम मंदीर उभारण्याचा असो, आता भारताच्या विकासाचे मुद्दे जाहीर नाम्यात आहेत आणि ते आम्ही पूर्ण करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


या निवडणुकीत केवळ कामच बोलेल


दरम्यान, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) समाज माध्यमाचा जास्त वापर होताना दिसत आहे. मग तो स्वतःचा प्रचार करण्यासाठी असो की समोरच्या उमेदवाराचे चारित्र्य हनन करण्यासाठी असो, यावर बोलताना सोशल मीडियावर केवळ चर्चा होऊ शकते त्यावर मतदान ठरत नाही. या निवडणुकीत केवळ कामच बोलेल, असं भाजपचे उमेदवार सुजय विखेंनी म्हंटले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


उद्धव ठाकरे गद्दार, पवारांनी मुख्यमंत्रीपदाचं चॉकलेट दिलं; नारायण राणेंचा मविआवर प्रहार


'शरद पवारांकडून सुनेबाबतचं असं वक्तव्य अपेक्षित नव्हतं', अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील नेत्याकडून खरपूस समाचार