मुंबई :  महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं सभागृहात काल झालेल्या प्रकरणात निलंबन करण्यात आलं आहे. अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आल्याची घोषणा नीलम गोऱ्हे यांनी केली. यानंतर सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले. नीलम गोऱ्हे यांनी विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलण्याच्या परवानगी दिली असता देवेंद्र फडणवीस आक्रमक झाले आणि त्यांनी  आक्षेप घेतला. यानंतर विरोधकांना संधी न देता पुढील कामकाज सुरु करण्यात आलं. 


लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींच्या वक्तव्यावरुन महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत राडा झाला. अंबादास दानवेंनी आपल्याकडे हात करणाऱ्या प्रसाद लाड यांना शिवीगाळ केली. त्यानंतर आज भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आज विधान भवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. अंबादास दानवेंनी माफी मागावी, आणि त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली. तर चंद्रकांत पाचील यांनी दानवेंच्या निलंबनाची मागणी केली.   चंद्रकांत पाटील म्हणाले,   अंबादास दानवे यांनी प्रसाद लाड यांच्याकडे पाहत अर्वाच्य भाषा वापरली आहे. त्यांच्या बेशिस्त वर्तनाबाबत  पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात यावे.  


निलंबनानंतर निलम गोऱ्हे काय म्हणाल्या? (Nilam Gorhe On ACtion)


उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या,  गटनेत्यांच्या बैठकीला आंबादास दानवे उपस्थित नव्हते. कालच्या प्रकाराबाबत त्यांनी माफी मागितली नाही. काल आमच्या समोर हा प्रकार घडला. त्यांच्या पक्षाच्या नेतेमंडळीनी  विचार करायला हवं की, संबंधित व्यक्ती महिलांसमोर अशी भाषा वापरत आहे, हे गंभीर आहे. महिलांना काम करणं भविष्यात मुश्किल होईल. म्हणून ही न्याय आणि उचित कारवाई केली आहे.


बहुमताच्या जोरावर आमच्या सदस्याचे निलंबन, अनिल परबांची टीका (Anil Parab On Suspension) 


दानवेंच्या निलंबनानंतर अनिल परब म्हणाले,  सभापती यांनी बहुमताच्या जोरावर आमच्या सदस्याचे निलंबन केलं आहे. त्यामुळे आम्ही सभागृहाच्या कामकाजावर बहिष्कार टाकून बाहेर पडतो. बहुमताच्या जोरावर तुम्ही निर्णय घेताय मात्र ठरवावर आम्हला बोलायला द्या. आमचा बोलण्याचा अधिकार आहे .


देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? (Devendra Fadnavis On Suspenion)


सभागृहात अशी घटना कधीही घटना घडली नाही त्यामुळे अशा ठरवावर काधीही चर्चा होतं नाही, असे फडणवीस म्हणाले. 


विरोधकांकडून जोरदार घोषणाबाजी


नीलम गोऱ्हे यांनी अंबादास दानवे यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडल्यानंतर मताला टाकला. आवाजी मतदानानं अंबादास दानवे यांचं निलंबन करण्यात आलं. यानंतर विरोधी पक्षाच्या  सदस्यांनी निलंबनाच्या कारवाई विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. 


काय म्हणले होते अंबादास दानवे?


 बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असंही दानवे यावेळी बोलताना म्हणाले.


Video : अंबादास दानवेंच्या निलंबनावेळी सभागृहात काय घडलं?



हे ही वाचा :


Vidhansabha Monsoon Session: विधानभवनाच्या लॉबीत देवेंद्र फडणवीस-आदित्य ठाकरेंची भेट, हसतखेळत संवाद, राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या