Ambadas Danve, Nagpur : "मस्साजोग घटनेतील वाल्मिकी कराड हे नागपूरातील फार्म हाऊसवर आहे. मागील 4 दिवसांपासून तो नागपुरात आहे. मी त्यांचा पत्ता देऊ शकतो. पण पोलीस त्याला पकडत नाहीत", असा दावा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे विधानपरिषदेतील नेते अंबादास दानवे यांनी केलाय. ते विधानपरिषदेत बोलत होते. 


धनंजय मुंडे अधिवेशनापासून दूर 


दरम्यान, महायुतीचं खातेवाटप होण्याआधीच धनंजय मुंडे वाद्याच्या भोवऱ्यात सापडले आहेत. बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणानंतर राजकारण तापलंय. या हत्याप्रकरणाचा थेट संबंध वाल्मिक कराड यांच्याशी असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय. वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा मानला जातो. त्यामुळे त्याला वाचवण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही आव्हाड यांनी केलाय. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून धनंजय मुंडे अधिवेशानापासून दूर असल्याचं चित्र आहे. 


विधानसभेत मुंडेंचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक करांडांवर गंभीर आरोप 


आज विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड प्रकरणावरुन उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. मात्र धनंजय मुंडे नागपूरला असून विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले नाहीत…संतोष देशमुख प्रकरणात विरोधक धनंजय मुंडे यांना संशयाच्या भूमिकेत पाहिलं जात आहे. याशिवाय, त्यांचे निकटवर्तीय असलेल्या वाल्मिक कराड यांच्यावरही गंभीर आरोप करण्यात आले आहेत.


देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले? 


देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरपंच हत्येचा गुन्हा ज्याने केलाय, त्यावर कोणीही असला तरी कारवाई केली जाईल. आपण वारंवार वाल्मिक कराडचं नाव घेतलं म्हणून वाल्मिक कराडचं नाव घेऊन सांगतो. एका गुन्ह्यात तर त्याचा पुरावा दिसतोच आहे. त्यावर कारवाई होणारच आहे. पण याही गुन्ह्यामध्ये जर वाल्मिक कराड बद्दलचे पुरावे असतील तर त्यावर कारवाई होईल. 


तुम्ही वाल्मिक कराडची कसली चौकशी करणार? जितेंद्र आव्हाडांचा सवाल  


जितेंद्र आव्हाड म्हणाले, वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांना वाचवण्याचं काम सरकार करत आहे का? धनंजय मुंडे सरकारमध्ये आहेत. तुम्ही वाल्मिक कराडची कसली चौकशी करणार? आम्ही कोणा बरोबरही फोटो असले तरी त्यांना सोडणार नाही, असं म्हणता. तुमच्या बरोबर फोटो आहेत. 


सुरेश धस म्हणाले, हा जो माणूस आहे आणि यांचा जो आका आहे. त्या आकाने कोणा कोणाच्या जमीनी बळकावल्या आहेत. कोणाकोणावर अन्याय केलाय. त्या सर्वांनी त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी पुढे यावं. जे त्यांचे शाहगिर्द आहेत. त्यांनी सगळं समोर आलय. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Dhananjay Munde : तीन दिवसांनंतर अखेर मंत्री धनंजय मुंडे समोर आले, वाल्मिक कराडांबद्दल भूमिका मांडली