मुंबई : मराठवाड्यातील ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडणार अशा चर्चा रंगल्या आहेत. अंबादास दानवे (Ambadas Danve) लोकसभेचं तिकीट (Lok Sabha Election 2024) न मिळाल्याने नाराज असल्याने महायुतीच्या (Mahayuti) वाटेवर असल्याच्या बातम्या काही माध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आल्या होत्या. याबाबत अंबादास दानवे (Ambadas Danve Facebook Live) यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. या सर्व बातम्या खोट्या असल्याचं ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं आहे. अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषद घेत या मुद्द्यावल विरोधकांना लक्ष्य केलं आहे. 


महायुतीत जाणाच्या चर्चेवर अंबादास दानवेंचं स्पष्टीकरण


अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटलं की, ज्या चॅनेलवाल्यांनी बातमी चालवली. त्यांनी ही बातमी खोटी बातमी दिली. मी खोट्या बातम्या दिल्या त्यांच्यावर मानहानी दावा करणार आहे. मी 30 वर्ष जुना शिवसैनिक आहे. ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार, कायदेशीर कारवाई केली जाईल. मी शिवसेनेचा आहे. मला गट प्रमुख पदापासून विरोधी पक्ष नेता झालो आहे, त्यामुळे निवडणूक येतात-जातात, पण मी जाणार नाही. चॅनेलच्या टीआरपीसाठी काहीही चालवू नका, असा इशारा दानवेंनी यावेळी दिला आहे.


माझ्या नाराजीचा फायदा घेतला


मी नाराजी व्यक्त केली, त्याचा फायदा चॅनेल घेतला आहे. मी 30 वर्ष शिवसेनेचं काम करतोय, त्यामुळे या बातम्यात तथ्य नाही. आमच्या शिवसेनेनेचा स्वतंत्र विचार आणि बाणा आहे. मी अगोदरच  लोकसभा निवडणुकीसाठी प्रचार केलाय आणि करणार आहे.


मी ठाकरे गटातच आहे : अंबादास दानवे


खोट्या बातम्या दाखवणाऱ्या चॅनेलवनर मानहानीचा खटला भरणार आहे.  मी शिवसेनेतच आहे. कोणत्याही आधार नसलेल्या बातम्या दिल्या जाता आहेत. मी भाजपमध्ये जाणार ही बातमी खोटी आहे. मी ठाकरे गटातच आहे, असं स्पष्टीकरण अंबादास दानवे यांनी दिलं आहे. 


लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने अंबादास दानवेंची नाराजी?


लोकसभेचं तिकीट न मिळाल्याने नाराज असल्याच्या पत्रकारांच्या प्रश्वावर अंबादास दानवे यांनी उत्तर देताना म्हटलं की, उमेदवारी न मिळाल्याने नाराज होते, पण आपला स्वभाव दररोज सारखा नसतो. तुम्ही कधी नाराज नसता का असा सवाल देखील अंबादास दानवे यांनी यावेळी पत्रकारांना विचारला. मी पक्षप्रमुखांसोबत चर्चा केली. नाराजीचा प्रश्न फक्त उमेदवारी जाहीर झाली तेवढ्या पुरता होता. मी शिवसेनेचा प्रचार केला आणि आताही मी प्रचारासाठी फिरणार आहे, स्टार प्रचारकांच्या यादीत माझं नाव आहे, असंही अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं


चंद्रकांत खैरे यांच्या उमेदवारीवर अंबादास दानवे काय म्हणाले?


चंद्रकांत खैरे आणि माझ्यामध्ये कोणतेही मतभेद नव्हते. खैरे साहेबांनी तिकीट मागितलं होतं आणि मीही तिकीट मागितलं होतं. तिकीट मागितलं म्हणजे मतभेद आहेत, असं नाही. खैरे साहेब आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छत्रपती संभआजीनगरचे ते पालक आहेत. आम्हा सर्वांना तरुण कार्यकर्त्यांना सांभाळण्याचं काम त्यांनी सातत्याने केलं आहे. आजही आम्ही त्यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये काम करत आहोत.


पाहा व्हिडीओ : काय म्हणाले अंबादास दानवे?



महत्त्वाच्या इतर बातम्या :


याचना नहीं अब रण होंगा... अंबादास दानवे ठाकरे गट सोडण्याची चर्चा, उद्धव ठाकरेंचा फोटो शेअर करत फेसबुकवर पोस्ट