Ambadas Danve, Mumbai : "माझा तोल सुटलेला नाही. माझ्यावर बोट केलं तर मला बोट तोडण्याचा अधिकार आहे. मी विरोध पक्षनेता नंतर आहे, आधी शिवसैनिक आहे", असे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे म्हणाले. विधानपरिषदेत अंबादास दानवे आक्रमक झालेले पाहायला मिळाले. अंबादास दानवे यांच्याकडून आज विधानपरिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांना शिवीगाळ देखील करण्यात आली.
बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? अंबादास दानवेंची टीका
अंबादास दानवे म्हणाले, बाटगा प्रसाद लाड मला हिंदूत्व शिकवणार आहे का? पक्षात धंद्यासाठी हा माणूस काम करतो. माझ्यावर बोट दाखवून बोलतो. सभापतींना बोल मला बोट का दाखवतो? तो कसा मला राजीनामा मागू शकतो? माझे पक्षप्रमुख निर्णय घेतील. राहुल गांधींचा विषय विधान परिषदेत का काढला? मला पश्चाताप नाही, माझा शिवसैनिक जागा झाला. माझ्यावर सुद्धा केसेस आहेत. हिंदुत्व साठी केसेस घेतल्या आहेत. हे शेपूट घालून पळणारे हिंदुत्ववादी आहेत, असंही दावने यावेळी बोलताना म्हणाले.
"पक्षपातीपणा करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो"
विधानपरिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे पक्षपातीपणा करत असल्याची टीका विरोधकांनी केली होती. मला उपसभापती बोलू देत नाहीत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला. त्यांनी विरोधकांनी "पक्षपातीपणा करणाऱ्या उपसभापतींचा धिक्कार असो", अशा घोषणाही दिल्या. त्यानंतर विरोधकांनी आरडा-ओरडा बंद केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही, असं निलम गोऱ्हे यांनी म्हटलं होतं.
मोठं मोठी खासगी रुग्णालये सरकारी योजनेतून रुग्णांचे उपचार करण्यास टाळाटाळ करतात. तसेच धाराशिव,संभाजीनगर व मुंबई येथे रुग्णालयाचे दर वेगवेगळे आहेत. त्यामुळे रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे हाल होतात. त्यामुळे या रुग्णालयांसाठी झोन निहाय धोरण आणण्याची गरज आहे. त्यासाठी सरकार पाऊले उचलणार का? असा सवालही अंबादास दानवे यांनी आज विधानपरिषदेत उपस्थित केला.
— Ambadas Danve (@iambadasdanve) July 1, 2024
इतर महत्वाच्या बातम्या
Sadanand Chavan : भाजप- शिवसेना युती होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नंतर आला, चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघावर शिंदेंच्या शिवसेनेने दावा ठोकला