नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा सुरु आहे. विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी लोकसभेत (Lok Sabha) या चर्चेत बोलताना केलेल्या वक्तव्यानंतर जोरदार गदारोळ झाला. राहुल गांधी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की, नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात एका दिवशी म्हटलं की हिंदुस्ताननं कधी कुणावर आक्रमण केलं नाही. याचं कारण आहे हिंदुस्तान अहिंसेचा देश आहे. आपल्या महापुरुषांनी डरो मत, डराओ मत असं म्हटलं. भगवान शंकर म्हणतात डरो मत, डराओ मत आणि त्रिशुल जमीन रोवतात. दुसरीकडे जे लोक स्वत:ला हिंदू म्हणतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा, नफरत-नफरत-नफरत, तुम्ही हिंदू असूच शकत नाही, हिंदू धर्मानं स्पष्टपणे म्हटलंय सत्याची साथ द्या. यानंतर भाजप नेते भाजप आक्रमक झाले.  राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप घेतला. 


राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी उभे राहिले आणि या प्रकरणाला गंभीर प्रकरण असल्याचं म्हटलं. संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणनं गंभीर असल्याचं त्यांनी म्हटलं.


नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्यावर राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप म्हणजे संपूर्ण हिंदू समाज नाही, असं म्हटलं. यानंतर अमित शाह बोलायला उभे राहिले, त्यांनी म्हटलं की विरोधी पक्ष नेत्यांनी यावर माफी मागितली पाहिजे. कोट्यवधी लोक स्वत:ला अभिमानानं हिंदू म्हणतात, असं अमित शाह म्हणाले. राहुल गांधी यांनी अभय मुद्रा या विषयावर अभय मुद्रा मुद्यावर इस्लमाच्या विद्वानांचं मत घ्यावं, असं अमित  शाह म्हणाले. 



अयोध्येनं मेसेज दिला


राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात पुढे भगवान रामाच्या जन्मभूमीतून भाजपला मेसेज दिला आहे, असं म्हटलं. काल कॉफी पिताना अवधेश प्रसाद यांच्याशी चर्चा केली. अवधेश प्रसाद यांनी निवडणुकीत जिंकणार असल्याचं माहिती असल्याचं सांगितलेलं. जे जे छोटे छोटे दुकानदार आहेत, छोटी छोटी बिल्डींग होत्या सर्व पाडल्या गेल्या. अयोध्येत राम मंदिराच्या उद्घाटनावेळी अंबानी, अदानी होते पण तिथलं कोण नव्हतं, असं राहुल गांधी म्हणाले.  


राहुल गांधी पुढं बोलताना भारत जोडो यात्रेतील अनुभव सभागृहात माडले. महागाईनं महिलांच्या मनात भीती निर्माण केल्याचं म्हटलं. राहुल गांधींनी पुढे अग्निवीर आणि मणिपूरच्या मुद्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. नोटबंदी आणि जीएसटीच्या मुद्यावरुन देखील हल्लाबोल केला. गुजरातमध्ये भाजपला इंडिया आघाडी पराभूत करणार आहे, लिहून घ्या असं म्हणत राहुल गांधी यांनी भाजपला चॅलेंज दिलं.


संबंधित बातम्या :


दीक्षाभूमी परिसरातील भूमिगत पार्किंगच्या कामाला स्थगिती, देवेंद्र फडणवीसांची विधिमंडळात घोषणा!


Ajit Pawar : शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेचा पर्याय देण्याचा निर्णय पुढील 3 महिन्यांच्या आत घेणार, अजित पवारांचा शब्द