ठाणे : बदलापूर अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणावर आज पुन्हा एकदा न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यावेळी, न्यायालयाने पोलिसांना काही प्रश्न विचारत फैलावर घेतले आहे. तसेच, संबंधित शाळेच्या ट्रस्टींना एका प्रकरणात जामीन दिला असून दुसऱ्या प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यावरुन, आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच,एन्काऊंटर प्रकरणावरही भाष्य केलंय. आधी अक्षय शिंदेची हत्या होते, मी त्याला एन्काऊंटर म्हणणार नाही आणि कोर्टही त्याला मानायला तयार नाही.  याप्रकरणी आज कोर्टात त्यांनी जी स्टोरी सांगितली ती भयानक होती, पाणी मागितलं म्हणून हतकड्या सोडल्या आणि त्यांनी हतकड्या सोडल्यावर त्याने पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिण्याच्या वेळात डाव साधला, असा युक्तिवाद कोर्टात झाल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली.  


अक्षय शिंदेने पाणी मागितलं म्हणून पोलिसांनी हतकड्या सोडल्या आणि त्यांनी हतकड्या सोडल्यावर त्याने पाणी प्यायला मागितलं आणि पाणी पिण्याच्या वेळात डाव साधला. पण, पाण्याची बॉटल देताना हातकड्या सोडतात का, असं कुठे रुल बुकमध्ये लिहिला आहे का?, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय.  आरोपीच्या हातातील बेडी सोडली तरी एक बेडी हातात ठेवतात,  त्याच्या पोस्टमार्टमच्या वेळेस किंवा त्याचे फोटो निघाले त्यावेळी त्याच्या हातात हतकडी होती का की नव्हती?, असाही सवाल आव्हाड यांनी एन्काऊंटरप्रकरणी उपस्थित केलाय. कोर्टाने ताशेरे झाडले आहेत. पोलीस रुलप्रमाणे कोणत्या पोलीस अधिकाऱ्याने त्या गाडीत बसायला पाहिजे, तुम्ही ते रुल झुगारून जे काय करायचं, ते केलं. त्याला शिक्षा करायला पाहिजे याबद्दल कोणाचंही दुमत नाही. पण, तुम्ही त्यातून काहीतरी लपवत आहात अशी शंका निर्माण होते, असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच, बदलापूर प्रकरणातील आरोपी संस्थाचालकांना अटक झाल्यावरूनही सरकारला धारेवर धरलं आहे. 


कोर्टाने सरकारला आणि पोलिसांना झापलं, तेव्हा आरोपी आपट्या आणि दुसरे जे कोण आहेत, ते सापडले. म्हणजे हे लपलेले पण पोलिसांनाच विचारुन का, असा सवाल आव्हाड यांनी विचारला आहे. मग आपटे आणि ट्रस्टीचे हे कटकारस्थान आहे, असा संशय का येणार नाही. या शाळेतलं हे सगळं अक्षय शिंदेला माहिती होतं, आणि ते कटकारस्थान लपवण्यासाठी समाजात अब्रू जाऊ नये, यासाठी एका गरीबाच बळी घेतला तर काय फरक पडतो. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, असं म्हणतात ना, कोर्टाने झापल्यानंतर ते कसे काय बाहेर येतात, असा सवालही आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.  


हेही वाचा


गौरस्वास्पद... 13 कोटी मराठीजनांची स्वप्नपूर्ती; मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला, काय होणार फायदा