Ajit Pawar, Pune : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी एका नागरिकाला मारहाण केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला मारहाण केल्याचे समोर आले आहे. बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.  या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर आज एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 


या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाटी केलेली पाहायला मिळाली आहे. जमिनीच्या वादातून नागरिकाला मारहाण केल्याची माहिती समोर आलीये. दरम्यान, त्यानंतर मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विजय रौधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली आहे. कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार करण्यात आला. यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय.  याबाबत पोलीस तक्रार देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबुराव चांदेरे यांनी केली नागरिकाला मारहाण


राष्ट्रवादी काँग्रेस नेते बाबुराव चांदेरे यांनी भरदिवसा विजय रौंदळ या नागरिकाला  केली मारहाण


बाबुराव चांदेरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे माजी नगरसेवक पुणे महानगरपालिकेचे स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत. 


या अगोदरही बाबुराव चांदेरे यांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यानंतर आज एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. 


या ठिकाणी नागरिक व्हिडिओ शूटिंग करत असताना त्यांच्या मोबाईलवर हात मारत त्यांना दमदाती केलेली पाहायला मिळते.


जमिनीच्या वादातून मारहाण केल्याची माहिती, चापट मारत उचलून आदळले.  


मारहाण करत फोन काढून घेण्याचा प्रयत्न केला यामध्ये विजय रौधळ यांच्या डोक्याला व गुडघ्याला जखम झाली आहे.


कर्मचारी, अधिकारी व ठेकेदारासमोर हा प्रकार करण्यात आला.


यानंतर आता बाबुराव चांदेरे यांचा हा व्हिडिओ व्हायरल होतोय 


याबाबत पोलीस तक्रार देण्यात आलेले आहेत त्यामुळे आता पोलीस काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे


इतर महत्त्वाच्या बातम्या


Walmik Karad : मोठी बातमी : वाल्मिक कराडला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज, जिल्हा कारागृहात रवानगी होणार