Rupali Chakankar, Mumbai : "अजित पवार (Ajit Pawar) यांनी दहाव्यांदा अर्थसंकल्प मांडत असताना महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या जनतेला शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांना भरभरुन दिलं. पण सर्वाधिक जर कोणाला दिलं तर आमच्या मातृशक्तीला दिलं. मग ते लाडकी बहिण योजनेच्या माध्यमातून असेल किंवा अन्नपूर्णा योजना असेल. खऱ्या अर्थाने महिलांचं सबलीकरण, सक्षमीकरण या माध्यमातून होतं आहे. या निमित्ताने अजितदादा प्रत्येक तालुक्यात स्वत: जात आहेत", असे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या. त्या नाशिकमध्ये बोलत होत्या.
झिरवळ साहेबांनी त्यांच्या मुलासंबंधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे
रुपाली चाकणकर म्हणाल्या, मला असं वाटतं की 365 दिवस अजितदादांचं काम चालू आहे. दररोज काम करणाऱ्या माणसाला निवडणूक आणि निवडणुकीचा कालावधी महत्वाचा नसतो. मला वाटतं आठ दिवसांपूर्वी झिरवळ साहेबांनी त्यांच्या मुलासंबंधीच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. त्याच्यामुळे मी परत त्याच्यावर बोलणं योग्य होणार नाही. मला वाटतं हे सर्व दिंडोरी भागातील आहेत, ते झिरवळ साहेब ठरवतील. ते माझ्यापेक्षा चांगलं उत्तर देतील, त्यांच्या प्रश्नांची उत्तर मी देणं योग्य नाही.
अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासमोर अनेक प्रश्न
संजय राठोड यांचं प्रकरण घडलं त्यावेळेस मी महिला आयोगाची अध्यक्ष नव्हते. मी पदावर येण्या अगोदरचे हे प्रकरण आहे. मी पदावर आले तेव्हापासून आमच्याकडे लिगल हेड सेल आहे. आम्ही सर्व प्रकरणांचा पाठपुरावा करत असतो. मला वाटतो कोणत्याही गोष्टीचा दुरुपयोग होऊ नये. कोर्टाने त्याबाबतचा निर्णय दिलेला आहे. त्यांच्या पक्षांतर्गत विषय आहेत. महिला आयोगाची अध्यक्ष म्हणून काम करत असताना माझ्यासमोर अनेक प्रश्न आहेत. त्याबाबत मी काम केलं तर माझ्या भगिनींना फायदा होईल, असंही चाकणकर यांनी सांगितलं.
रुपाली चाकणकर पुढे बोलताना म्हणाल्या, मनोज जरांगे काय बोलतात त्यापेक्षा जनता काय बोलते हे महत्वाचं आहे. जनतेचा कौल कसा आहे हे महत्वाचं आहे. पक्ष म्हणून आमची भूमिका वरिष्ठ नेते घेतील. भुजबळ साहेब आणि त्यांच्यावर होतं असलेले आरोप त्याचं खंडन ते करत आहेत. जी भूमिका योग्य आहे, ती घेण्याचं काम भुजबळ साहेब सातत्याने करत आहेत. शेवटी प्रत्येकाला आपल्या समाजाची भूमिका मांडण्याचा अधिकार असतो. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे, असं भुजबळ साहेब सांगत आले आहेत. तो त्यांचा हक्क आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Raosaheb Danve : भाजपसोबत असताना सर्व निर्णय मातोश्रीवर व्हायचे, आता उद्धव ठाकरेंवर दिल्लीत गांधींच्या दारात उभं राहण्याची वेळ : रावसाहेब दानवे