Ajit Pawar Speech : "एक जण तर म्हणाला अजित पवारांना शरद पवार साहेबांनी संधी दिली नसती तर अजित पवार म्हशी सांभाळत असते. अरे बाबा सांभाळले असते. त्यात काय, मी पण शेतकऱ्यांचा पोरगा आहे", असे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले. शिरुर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.


पंतप्रधानांच्या बाजूची मुख्यमंत्र्यांची खुर्ची मी घेतली


अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात आले होते. ते येण्यापूर्वी माझं भाषण झालं होतं. त्यानंतर मोदी साहेब आले, मग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाषणासाठी उभे राहिले. मग मी माझ्या खुर्चीवरून उठलो अन मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसलो. तात्पुरता बसलो बरं का? मोदी साहेबांना कांदा निर्यातीचा प्रश्न सांगितला, निर्यातबंदी हटविण्याची विनंती केली. पुढं काय घडलं ते तुम्ही पाहिलं आहे. 


मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली


पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, राजेश टोपे सर्व आमदारांच्या सह्यांचे पत्र घेऊन, शरद पवारांकडे गेले. आम्ही ही सगळे त्रासून होतो. त्यामुळं पवार साहेब म्हणाले मी राजीनामा देतो. भावनिक राजकारण, हेच नकोय. मी माझ्या राजकीय जीवनात खूप मोठी चूक केली. अमोल कोल्हेंना उमेदवारी देऊन खासदार केलं, आता हीच माझी चूक तुम्ही सुधारा. हे आवाहन करण्यासाठी मी इथं आलोय. 


बारामतीत कोण-कोणाच्या बाजूला होतं, अजित पवारांनी भर सभेत सांगून टाकलं


बारामतीत साठीच्या आतील आणि तरुण मंडळी म्हणायचे आम्हाला अजित दादा हवा. पण साठीच्या पुढची मंडळी म्हणायचे, नको राव उतार वयात पवार साहेबांसोबत राहू, असं भावनिक राजकारण केल्यानं विकास होत नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं. 


बिबट्याचे हल्ले वाढले आहेत. दिवसा वीज पुरवठा व्हावा, यासाठी मी पाठपुरावा करेन. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांचे जीव गेलेत, एखाद्याचा जीव जायला नको. यासाठी पिंजरे लावण्याची गरज आहे, वीज रात्रीऐवजी दिवसा द्यायला हवी. याबाबत पाठपुरावा करत राहीन. पण बिबट्याच्या बाबतीत राजकारण कसे काय करतात. ते खासदार तर नुसती डायलॉग बाजी करतात, असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं. 


इतर महत्वाच्या बातम्या 


घाबरले का? अदाणी, अंबानी टेम्पोने पैसे देतात यांचा वैयक्तिक अनुभव, राहुल गांधींचे पीएम मोदींना जोरदार प्रत्युत्तर