पुणे : बारामतीत मला एकटं पाडलं जातंय असं सुरूवातीला भावनिक आवाहन करणाऱ्या अजितदादांनी (Ajit Pawar) आता विरोधकांना थेट दमच दिला आहे. शिरूरमधून आढळराव पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा करताना त्यांनी ही निवडणूक गावकीची आणि भावकीची नाही, माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी बघतो त्याचं काय करायचं असं ते म्हणाले. अजित पवारांनी कुणाचं नाव जरी घेतलं नसलं तरी त्यांचा रोख हा काका शरद पवार, सख्खे भाऊ श्रीनिवास पवार (Shrinivas Pawar) आणि वहिणी शर्मिला पवारांकडे (Sharmila Pawar)  होता अशी चर्चा सुरू आहे.


खासदारकीला एक, आमदारकीला एक यापुढं असं अजिबात चालणार नाही. दोन्ही ठिकाणी घड्याळ चालवायचं आहे. प्रत्येकानं आपापला गाव बघा. आधी तर भावकी सोबत आहे का हे पण बघा. अरे बाबा मला भावकीच माहितेय असं अजित पवार म्हणाले. 


कुटुंबीयांनाच अजितदादांचा थेट इशारा?


बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचं नाव चर्चेत आहे. सुनेत्रा पवार यांनी निवडणुकीची तयारीही सुरू केली आहे. त्याचवेळी पवार कुटुंबीय मात्र सुप्रिया सुळेंच्या मागे खंबीर उभं असल्याचं दिसतंय. कुटुंबात आपल्याला एकटं पाडलं जातंय, तुम्ही साथ द्या अशी भावनिक साद या आधी अजित पवारांनी बारामतीकरांना घातली होती. त्यानंतर अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनीही अजित पवाांच्या विरोधात भूमिका घेत सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरू केला. 


पवार कुटुंबातून अजित पवारांवर होणाऱ्या टीकेनंतर आता अजित पवारांनी त्याला थेट उत्तर दिलंय. ही गावकीची आणि भावकीची निवडणूक नाही. आता माझ्या बाबतीत काहींनी भावकीची निवडणूक केली आहे, मी त्यांना बघून घेतोच असा थेट इशाराच त्यांनी दिलाय. 


श्रीनिवास पवार आणि शर्मिला पवारांची अजितदादांवर टीका


या आधी श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी अजित पवारांनी घेतलेल्या भूमिकेवर टीका केली होती. आजपर्यंत लोकसभेत शरद पवार आणि विधानसभेत अजित पवार असं चालत आलं होतं. एक तीळ सात जणांनी वाटून खायचा असतो. सगळं एकट्यानेच खायचं नसतं, असं म्हणत शर्मिला पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली होती. 


पंतप्रधान झाला तरी चुलत्याच्या पुढे जायचं नसतं


शर्मिला पवार या एका कार्यकर्त्याचा संदर्भ देत म्हणाल्या होत्या की, तू सरपंच हो, पंतप्रधान हो प्रेसिडेंट हो, तू काहीही हो, पण शेवटी वडील ते वडील आणि चुलता तो चुलता, मान तो मान. हा सन्मान आपण प्रत्येकाने दिलाच पाहिजे.


ही बातमी वाचा :