एक्स्प्लोर

तुम्हाला पक्षामुळे आमदारकी-खासदारकी मिळालेय लक्षात ठेवा, अजितदादांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना झापलं, आठ दिवसांचं टार्गेट दिलं

Ajit Pawar : सभासद नोंदणी कार्यक्रमाबाबत उपमुख्यमंत्री अजित दादांनी (Ajit Pawar) त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना तंबी देत पुढील आठ दिवसांचं टार्गेट दिले असल्याची माहिती पुढे आली आहे.

Mumbai : देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा भाजपकडून (BJP) कायम करण्यात येतो. लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणुकांनंतर पक्षसंघटना मजबूत करण्यावर सध्या भाजप लक्ष देत आहे. 10 कोटी लोकांना भाजपाशी जोडण्याचं लक्ष पक्षाकडून देण्यात आले आहे. परिणामी भाजप नेत्यापासून ते तळागळातील कार्यकर्ता त्यासाठी जोमाने कामाला लागल्याचे बघायला मिळाले असताना, महायुतीचा (Mahayuti) घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सभासद नोंदणी कार्यक्रमाबाबत काहीसे निरूत्साही असल्याचे बघायला मिळाले आहे. परिणामी अजित दादांनी (Ajit Pawar) त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना तंबी देत पुढील आठ दिवसांचं टार्गेट दिले असल्याची माहिती पुढे आली आहे.

तुम्हाला पक्षामुळे आमदारकी-खासदारकी मिळालेय लक्षात ठेवा- अजित पवार 

सभासद नोंदणी कार्यक्रमावरून अजित पवारांचा नाराजीचा सुर असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून कळते आहे. त्यामुळे अजित पवारांकडून पुढील 8 दिवसांत नवीन सभासद पक्षाला जोडून घेण्यासाठी डोळ्यासमोर एक आकडा निश्चित करून सदर नोंदणी पूर्ण करून घेण्याच्या सूचना अजित दादांनी त्यांच्या पक्षातील आमदार आणि मंत्र्यांना  दिल्या आहेत. यावेळी बोलताना त्यांनी आमदार आणि मंत्र्यांचे कान देखील टोचले असल्याची माहिती पुढे आली आहे. केवळ पक्षामुळेच आमदारकी खासदारकी मंत्रिपद मिळत असतं, त्यामुळे पक्ष वाढीकडे देखील प्रामुख्याने लक्ष द्या आणि जास्तीत जास्त नवीन सभासद पक्षाला जोडून घ्या. अशी तंबी ही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी यावेळी दिली आहे.

मुंबईतील देवगिरी निवासस्थानी आमदार आणि मंत्र्यांच्या पार पडलेल्या बैठकीत अजित पवारांनी या सूचना दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे अजित दादांच्या शब्द आता तरी आमदार मंत्री आणि कार्यकर्ते कितपत पाळतात आणि पक्षाला अधिक बळकटी मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

पुण्यातील एमपीएससी विद्यार्थीनी घेतली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची भेट 

मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना EWS व SEBC यांच्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी MPSC विद्यार्थ्यांनी भेट घेतली आहे. परीक्षासाठी तांत्रिक अडचणीचे दिवस वगळून 45 दिवसांचा पूर्ण अवधी द्यावा, या मागणीसाठी निवेदन यावेळी दिले आहे.  कम्बाईन जागा वाढीसंदर्भात सामान्य प्रशासनाच्या सचिव यांच्याशी सुद्धा सकारात्मक चर्चा केली. यावेळी विद्यार्थी सोबत राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्त्या रूपाली पाटील उपस्थितीत होत्या.

इतर महत्वाच्या बातम्या 

 

ENBA 2020,2021 पुरस्कार विजेता, अरुण साधू पाठ्यवृत्ती धारक, शोध पत्रकार.  मागील सहा वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत.... 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Ladaki Bahin Yojana :लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
लाडकी बहीण योजनेतून 92 लाख अपात्र महिलांची नावं कापली, सरकारचा आर्थिक भार कमी झाला, साडेचार लाख सरकारी कर्मचाऱ्यांचाकडून गैरफायदा
Shivsena UBT: आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
आधी सरनाईकांचा खळबळजनक दावा, मग कळंबचे नगरसेवक तानाजी सावंतांच्या भेटीला, उद्धव ठाकरेंनी कैलास पाटलांसह धाराशिवच्या सर्वांना मातोश्रीवर बोलावलं
BMC Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात
मुंबईच्या महापौर रितू तावडेंच्या प्रसिद्धीसाठी BMCच्या तिजोरीतून 25 लाख खर्च होणार? स्थायी समितीतील 'तो' प्रस्ताव वादाच्या भोवऱ्यात

व्हिडीओ

Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Rent Homes: पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
पुणे पोलिसांची मोठी कारवाई, भाडेकरुंची माहिती न देणाऱ्या 170 घरमालकांवर थेट गुन्हे दाखल, गुन्हेगार, दहशतवाद्यांमुळे महत्त्वाचं पाऊल
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
हाॅटेलवर हाॅटेल असलेल्या पाच मजली इमारतीच्या भीषण अग्नितांडवात चार वर्षाच्या चिमुरड्यासह 9 जण जिवंत जळाले; आतापर्यंत 80 जणांना वाचवलं, अग्निकांडानंतर इमारतीचा मालक फरार
Pune Crime News: टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
टीव्ही बघताना नराधमाने चिमुरडीला घराबाहेर बोलावलं, शेतात नको ते कृत्य करुन संपवलं, जुन्नरच्या पिंपळवंडीत काय घडलं?
David Warner News : कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
कोर्टाने सुनावली शिक्षा, अन् मीडियाने डेव्हिड वॉर्नरला घेरलं! पण पुढच्याच क्षणी अनर्थ टळला; कोर्टाबाहेर ऑस्ट्रेलियन खेळाडूसोबत काय घडलं?, VIDEO
Wardha Crime News: प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
प्रेमसंबंधात पतीचा अडसर; पत्नीनं प्रियकरासह तिघांच्या मदतीनं नवऱ्याला संपवलं, मृतदेह शेतात फेकला अन्... चक्रावणारी माहिती समोर
Devendra Fadnavis and Sergio Gor: महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, एक म्हणजे मुंबई अन् दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस... अमेरिकेच्या राजदूतांकडून मुख्यमंत्र्यांचं कौतुक
Chhatrapati Sambhajinagar FDA: तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
तुकाराम मुंढेंच्या एफडीएचा ब्लिंकइटच्या गोडाऊनवर छापा; खराब फ्रोझन चिकन, सिगरेटची थोटकं अन् उंदीर पाहताच...
Dombivli Crime news: डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
डोंबिवलीत फेरीवाल्यांची दादागिरी, थेट पोलिसांना नडले, बायका अंगावर धावून गेल्या अन्...
Embed widget