Ajit Pawar on Sharad Pawar, Pune : पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठकीवरुन आज राजकारण चांगलचं तापलेलं पाहायला मिळालं. कारण पीडीसीसीच्या डीपीडीसीच्या बैठकीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांनी हजेरी लावली. शिवाय महायुतीचेही काही आमदार उपस्थित राहिले. बैठक सुरु झाल्यानंतर शरद पवार (Sharad Pawar) आणि सुप्रिया सुळेंनी (Supriya Sule) मुद्दे मांडण्यास आणि प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी तुम्हाला इथे बोलण्याचा अधिकार नाही, असा खुलासा केला. शिवाय याबाबतचा जीआरही त्यांनी सर्वांना दाखवला. दरम्यान, अजित पवार यांनी नियम सांगितल्यानंतर शरद पवार यांनी सावध पवित्रा घेतलेला पाहायला मिळाला. तर आम्हाला बैठकीत बोलण्याचा अधिकार नसेल, तर इथे येण्यातही अर्थ नाही, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
अजित पवार बैठकीत काय काय म्हणाले ?
- पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत अजित पवार यांचा धक्कादायक खुलासा
- समितीच्या बैठकीत आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत.
- त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. अजित पवार यांची स्पष्टोक्ती
- जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न त्यांची बाजू त्यांचे मुद्दे मांडू शकतात, पण इतके वर्ष मी पालकमंत्री होतो जिल्हा परिषद ताब्यात होती म्हणून मी आमदार खासदारांना काही बोललो नाही.
-नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही.
आजच्या पुणे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकी शरद पवार, सुप्रिया सुळे, अमोल कोल्हे आणि महायुतीचेही काही आमदार प्रश्न, मुद्दे आणि त्यांच्या मतदारसंघातील समस्या मांडत होते. त्यावर अजित पवार यांनी केलेलं हे वक्तव्य धक्कादायक मानलं जात आहे. बैठकीत शरद पवार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केला ना त्यांना काट शह देण्याचा तर हा अजित पवार यांचा प्रयत्न नाही ना अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या