एक्स्प्लोर

Ajit Pawar: जरंडेश्वर प्रकरणाच्या चौकशीची फाईल एसीबीने पुन्हा ओपन केलेय, प्रश्न विचारताच अजित पवार म्हणाले...

Pune News: पुण्यात अजित पवारांची पत्रकार परिषद. पुणे अपघात प्रकरणावर अजित पवारांनी सविस्तरपणे भूमिका मांडली. मला जाणीवपूर्वक कोणी अडचणीत आणत नाही. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी आहेत, मला काळजी नाही.

पुणे: लोकसभा निवडणुकीचे मतदान संपल्यानंतर जरंडेश्वर साखर कारखान्यातील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून (ACB) पुन्हा चौकशी सुरु करण्यात आली होती. यामुळे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी पुन्हा वाढल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत विचारणा केली असता त्यांनी, 'मला कोणीही अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत नाही', असे म्हटले. 

एसीबीने जरंडेश्वर कारखाना प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरु केली असेल तर तुम्हाला काय त्रास होतोय? ज्या कोणाविरोधात भ्रष्टाचाराची तक्रार असेल तर त्याची चौकशी करणे, हे संबंधित यंत्रणेचे काम आहे. एखाद्या प्रकरणात एका तपास यंत्रणेने चौकशी बंद केली पण नंतर दुसऱ्या डिपार्टमेंटला त्या प्रकरणाची चौकशी करावी, असे वाटले तर त्यांनी ते करण्यात गैर काय आहे? तुमची, आमची किंवा आणखी कोणाचीही चौकशी करायची असेल तर तपास यंत्रणांना ती चौकशी करु शकतात, असे अजित पवार यांनी म्हटले. 

माझी काळजी करु नका, मला कोणीही जाणीवपूर्वक अडचणीत आणत नाही: अजित पवार

जरंडेश्वर प्रकरणाची चौकशी पु्न्हा सुरु झाल्यामुळे तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होत आहे का, असे अजित पवारांना विचारण्यात आले. यावर अजित पवार यांनी म्हटले, मला जाणीवपूर्वक कोणीही अडचणीत आणत नाही. काळजी करु नका. तुमच्यासारखे हितचिंतक माझ्या पाठीशी असताना मला काळजी नाही. मी राजकीय जीवनात काम करताना काहीही वेडवाकडं  काम करत नाही. त्यामुळे मी निर्धास्त असतो, असे अजित पवार यांनी सांगितले. 

अजित पवारांकडून सुनील टिंगरेंची भक्कम पाठराखण: 

पुणे अपघात प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, अजित पवार यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सुनील टिंगरे यांची भक्कमपणे पाठराखण केली. आमदारांच्या मतदारसंघात एखादी घटना घडल्यास त्यांना संबंधित ठिकाणी जावं लागतं. एकदा सुनील टिंगरेंच्या मतदासंघात स्लॅब कोसळला होता. त्यावेळीही ते मदतीला धावून गेले होते. लोकप्रतिनिधी या नात्याने ज्या गोष्टी करायच्या असतात, त्या ते करतात. ज्यावेळेस आपल्या पुण्यात पूर येतो, एखादी घटना घडते तेव्हा स्थानिक आमदार उपस्थित असतात, घटनास्थळी जातात आणि मदत करण्याच्या प्रयत्न करतात. कल्याणीनगर परिसरातील अपघातानंतर रात्री उशीरा सुनील टिंगरेंना फोन आला. आता फोन कोणाचा आला हे त्यांनी सांगितलं आहे. मग सुनील टिंगरे पोलीस स्टेशनला गेले होते. सुनील टिंगरेंनी कोणालाही पाठिशी घाला, असं सांगितलं नाही, असे सांगत अजित पवार यांनी टिंगरेंची पाठराखण केली.

आणखी वाचा

मुलाला, बापाला, बापाच्या बापाला पण अरेस्ट केलं; सरकार कोणतीही लपवाछपवी करत नाही: अजित पवार

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live News Updates: वसई-विरारकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर, 2030 पर्यंत विरारपर्यंत पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका पूर्ण करण्याचे लक्ष्य
वसई-विरारकरांचा लोकल प्रवास होणार सुखकर, 2030 पर्यंत विरारपर्यंत पाचवी-सहावी रेल्वे मार्गिका पूर्ण करण्याचे लक्ष्य
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
एका बाजूला काँग्रेससोबत चर्चा सुरु, दुसऱ्या बाजूला समाजवादी पक्षाचा मोठा निर्णय, उमेदवारांची पहिली यादी जाहीर
Indapur BJP vs NCP Morcha : इंदापुरात महायुतीत मोठी ठिणगी! तहसीलदारांच्या विरोधात भाजप, तर समर्थनार्थ अजित पवार गटाचा एकाच दिवशी भव्य मोर्चा
इंदापुरात महायुतीत मोठी ठिणगी! तहसीलदारांच्या विरोधात भाजप, तर समर्थनार्थ अजित पवार गटाचा एकाच दिवशी भव्य मोर्चा
जतला पाणी मिळाल्यानंतर सर्वाधिक दुःख जयंत पाटलांना झालं, त्यांनी चीनमध्ये बसून फोनाफोनी सुरु केली, पडळकरांचा हल्लाबोल 
जतला पाणी मिळाल्यानंतर सर्वाधिक दुःख जयंत पाटलांना झालं, त्यांनी चीनमध्ये बसून फोनाफोनी सुरु केली, पडळकरांचा हल्लाबोल 

व्हिडीओ

Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Anjali Ambedkar X Post On Sharad Pawar : वंचितला भाजपची बी-टीम म्हणणाऱ्यांचे शरद पवार- सुप्रिया सुळेंवर मौन का? अंजली आंबेडकरांचे आरोप
Sanjay Raut vs Rahul Narvekar : राहुल नार्वेकरांवर ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय राऊतांचे गंभीर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Silver Rate : चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार, तज्ज्ञ काय म्हणतात? जाणून घ्या 
चांदी तीन महिन्यात 1 लाख रुपयांनी स्वस्त, आता चांदीचे दर महागणार की आणखी स्वस्त होणार?
Chikkodi Belagaum : 'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
'संबंध ठेव, नाहीतर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन'; धमकीला कंटाळून प्रियकराने 38 वर्षीय विवाहित प्रेयसीचा जंगलात नेऊन काटा काढला
Ramayana : मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
मोठी बातमी! बॉक्स ऑफिसवर 1700 कोटींचा धुमाकूळ, आता 'रामायण' 'या' ओटीटीवर दिसणार
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, लहान मुलांचाही समावेश, ए.के. शोरमा दुकानावर महापालिकेची तोडक कारवाई!
भिवंडीत शोरमा खाल्ल्याने विषबाधा, 34 जणांवर उपचार सुरु, महापालिकेकडून तोडक कारवाई सुरु
Vaibhav Sooryavanshi :  एक-दोन बॉल खेळल्यानंतरच मला..., 204 धावांची वादळी खेळी करणाऱ्या वैभव सूर्यवंशीची पहिली प्रतिक्रिया, बेबी बॉस काय म्हणाला?
एक-दोन बॉल खेळताच विकेटचा अंदाज, 204 धावा करणारा वैभव सूर्यवंशी म्हणाला...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
ऑक्सफोर्डमध्ये भाषण द्यायला जाणाऱ्या सौरव दासला दिल्ली विमानतळावर अडवलं; अभिजीत दिपकेंची संतप्त प्रतिक्रिया, हजारो कोटींचा घोटाळा केला असता...
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
वैभव सूर्यवंशीचं 52 बॉलमध्ये वादळी विक्रमी द्विशतक, 7 चौकार, 28 षटकार ठोकले
Gold Rate : सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, सोने दरासाठी 3 तारखा महत्त्वाच्या, सोनं महागणार की स्वस्त होणार?
सोने एका महिन्यात 18530 रुपयांनी स्वस्त, येत्या काळात सोनं महागणार की स्वस्त होणार?
Embed widget